sawada

खेदजनक :- तिन अपत्य बाबत चौकशी सुरू असताना त्या शिक्षिकेला आदर्श शिक्षक पुरस्कार!

खेदजनक :- तिन अपत्य बाबत चौकशी सुरू असताना त्या शिक्षिकेला आदर्श शिक्षक पुरस्कार!

रावेर ते जळगांव पर्यंत शिक्षण विभागाची दुप्पटी भुमिका?

“याबाबत सविस्तर माहिती घेण्यासाठी आज दि.६ सप्टेंबर २०२२ रोजी कार्यालयीन वेळेत भ्रमणध्वनी द्वारे संपर्क साधला असता सदर शिक्षिकेची विना विलंब चौकशीचे आदेश पत्र देणारे प्रा.शिक्षणाधिकारी विकास पाटील जि.प.जळगांव यांनी प्रतिसाद दिला नाही.”
—————————————

“तरी सदर प्रकरणी संबंधित शिक्षण विभागाचे अधिकारी यांची कुचकामी धृतराष्ट्रची भुमिकामुळे सरासरी १ वर्षांपासून न्याय मिळण्याची अपेक्षा भंग झाली.तरी दुधाचे दुध पाणीचे पाणी करण्यासाठी आता लवकरच कायदेशीर मार्गाने योग्य तो न्यायालयात याबाबत दाद मागितली जाईल.न्याय देण्या ऐैवजी सदर प्रकारे डिवचणाऱ्यांचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी शेवट पर्यंत लढा दिला दिला जाईल असे तक्रारदार व जागृत नागरिक युसूफ शाह व शेख फरीद यांनी सांगितले आहे.”
—————————————-

सावदा प्रतिनिधी युसूफ शाह

सावदा :- जळगांव जिल्ह्यातील रावेर येथील जि.प.उर्दु शाळा नं.१ मधील उपशिक्षिका गजाला तबस्सुम यांना ३ अपत्य असल्याचा व रावेर पंचायत समिती सभागृहाला अंधारात ठेवून थेट आर्दश शिक्षक पुरस्कारासाठी त्यांचे नावाचा प्रस्ताव जि.प.जळगांव येथे गटशिक्षणाधिकारी शैलेश दखणे यांनी परस्पर पाठवल्या बाबतचा गंभीर मुद्दा रावेर पं.स.च्या आढावा बैठकीत दि.९ सप्टेंबर २०२१ ला मोठ्या प्रमाणात गाजल्या पासून सतत इतर दुसऱ्या लायक शिक्षकांवर अन्याय होवू नये.तसेच चुकीच्या पद्धतीने आदर्श शिक्षक सारखा पुरस्कार वितरित होवू नये.आणि ३ अपत्यचे सत्य समोर यावे.जेणे करून शासनाची पगार स्वरुपात होणारी आर्थिक लूट होवू नये. असे चांगले उद्देश ठेवून शासनाचे शिक्षण विभागांतर्गत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे जागृत नागरिक म्हणून सावदा येथील युसूफ शाह सुपडू शाह व शेख फरीद शेख नुरोद्दीन यांनी रावेर ते जळगांव पर्यंत सदरील शिक्षिकेची सखोलपणे चौकशी करून पारदर्शक पद्धतीने नियमानुसार कारवाई करणे बाबत वेळोवेळी नावानिशी लेखी तक्रार अर्ज केलेले आहे.यानंतर सदर शिक्षिका व त्यांचे शिक्षक पती यांनी जाहीरपणे नियमांचे उल्लंघन करून तिसरे अपत्यला सोबत घेऊन प्रशासती पत्र व सत्कार सुविकारण्याची मालिका वेळोवेळी वृत्तपत्रात देखील प्रकाशित झालेली आहे.

तरी सुद्धा यादरम्यान विभागीय आयुक्त नाशिकच्या दि.२/९/२०२१ रोजी आदर्श शिक्षक पुरस्कार यादीत सदर शिक्षिकेचे नाव १४ व्या नं.वर देखील आले.मात्र सत्य उघडकीस करण्यासाठी युसूफ शाह व शेख फरीद यांनी रावेर पं.स.ते जि.प.जळगांव येथील शिक्षण विभागाचे अधिकारी यांची वेळोवेळी समक्ष भेटून केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने पाठपुरावा केल्यामुळे परिणामी प्राथमिक शिक्षण अधिकारी विकास पाटील जि.प.जळगांव यांनी गटविकास अधिकारी पं.स.रावेर यांना सदर शिक्षिके संदर्भात विना विलंब चौकशी करणे कामी दिलेल्या स्मसण पत्र १ अन्वये गेल्या शुक्रवारी पासून त्या शिक्षिकेची गटविकास अधिकारी दिपाली कोतवाल व गटशिक्षणाधिकारी शैलेश दखणे यांनी ३ अपत्य असल्याच्या तक्रारीवरून चौकशी सुरू केली असून त्यांना अपत्यांचे जन्म दाखले व इतर कागदपत्रांची मागणी केली व याबाबतचा अहवाल वरिष्ठांना सादर केला जाणार असून अंतिम निर्णय वरिष्ठ अधिकारी घेतील अशी स्थिती असताना तसेच वरील सर्व बाबींची अधिकृतपणे माहिती असूनही दि.५/९/२०२२ रोजी जळगांव येथे घेण्यात आलेल्या पुरस्कार सोहळ्यात विशेषकरून ज्या प्रा.शिक्षणाधिकारी विकास पाटील यांच्या आदेश स्मरण पत्र १ वरून सदरील शिक्षिका गजाला तबस्सुम यांची चौकशी सुरू असताना त्यांच्या समक्ष आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याने रावेर ते जळगांव पर्यंतचे संबंधित शिक्षण विभागाची दुप्पटी भुमिका बघुन शिक्षण क्षेत्रातील जाणकार व नागरिकांत चिंता सह आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button