Faijpur

फैजपूर -भुसावळ मुख्य रस्ता दुरुस्त व्हावा यासाठी आमदार शिरीष चौधरी यांना निवेदन..

फैजपूर -भुसावळ मुख्य रस्ता दुरुस्त व्हावा यासाठी आमदार शिरीष चौधरी यांना निवेदन..

प्रतिनिधी : सलीम पिंजारी फैजपूर तालुका यावल

फैजपूर : येथील भुसावळ रोडवरील छत्री चौफुली पासून पिंपरूड फाटा पर्यंत च्या रस्त्यावरिल डांबरीकरण रस्ता अत्यंत खराब झालेला असून रस्ता दुरुस्त करण्यासाठी आ. शिरीषदादा चौधरी यांना नगरसेवक केतन किरंगे, देवेंद्र बेंडाळे सह आदी कार्यकर्त्यांनी खिरोदा येथे जाऊन निवेदन दिले, त्यावर आ. चौधरी यांनी तात्काळ रस्ता दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले.* गेल्या 3 वर्षांपासून फैजपूर येथील भुसावळ रोडवरील छत्री चौफुली पासून पिंपरूड फाटा पर्यंत च्या रस्त्यावरिल डांबरीकरण रस्ता अत्यंत खराब झालेला असून या संपूर्ण 2 कि.मी. रस्त्यावर खड्ड्यात खड्डे खूप झालेले आहेत, त्या रस्त्यावरून जाणे येणे दुचाकी, चार, चाकी वाहतूक अत्यंत कठीण झालेली आहे, नागरिकांना मधुकर कारखाना मार्गे भुसावळ जावे लागत आहे, परंतु विरोदा, वढोदा, पिंपरूड, करंजी या गावांना जाणाऱ्यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे, दुचाकी, चार चाकी गाड्यांचे अतोनात नुकसान होत आहे, तरी तात्काळ भुसावळ रास्ता दुरुस्ती करण्यात यावी यासाठी फैजपूर येथील नगरसेवक केतन किरंगे, देवेंद्र बेंडाळे, गटनेते कलीम मण्यार, मनोहर नेमाडे, काँग्रेस शहराध्यक्षच शे. रियाज, मनोज पाटील, शेतकरी राजेश चौधरी, आदीं नागरीकांनी आ. शिरीषदादा चौधरी यांना खिरोदा येथे जाऊन निवेदन दिले, त्यावर आ. चौधरी यांनी तात्काळ रस्ता दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button