Nashik

खुटवडनगर रस्ता मनपाकडून प्रतिबंधक क्षेत्र म्हणून जाहीर कोरोनाचे रुग्ण वाढल्याने घेतला निर्णय .

खुटवडनगर रस्ता मनपाकडून प्रतिबंधक क्षेत्र म्हणून जाहीर
कोरोनाचे रुग्ण वाढल्याने घेतला निर्णय

नाशिक प्रतिनिधी शांताराम दुनबळे

नाशिक-: सिडको भागात कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने , कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या मागणीनुसार खुटवडनगर हा भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला आहे . सोमवारी आयटीआय फुल ते माउली लॉन्स हा मुख्य रस्ता बंद करण्यात आला आहे खुटवडनगर , वावरेनगर सिद्धटेकनगर , वृंदावननगर विठ्ठलनगर , चाणक्यनगर , जाधव संकुल , मोगलनगर , आम्रपाली लॉन्स परिसर या भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे . बाजारात नागरिकांची खरेदीसाठी गर्दी दिसते . फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होत नाही . या भागातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी परिसर पुढील आदेश येईपर्यंत बंद करण्यात आला आहे .

यासंदर्भात लोकप्रतिनिधी व मनपा अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली . त्यानंतर मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी खुटवडनगर परिसर पुढील आदेश येईपर्यंत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला . बैठकीत सिडको प्रभाग सभापती दीपक दातीर , नगरसेविका सुवर्णा मटाले , अलका आहिरे , प्रतिभा पवार , सिडको विभागीय अधिकारी संदेश शिंदे , सातपूरचे विभागीय अधिकारी गायकवाड , माजी नगरसेवक तानाजी जायभावे , संदीप गायकर , दीपक मटाले . आरोग्य अधिकारी , डॉ . छाया साळुखे आदी उपस्थित होते .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button