Baramati

बारामतीच्या महिला व बालविकास प्रकल्पाचे काम कौतुकास्पद

बारामतीच्या महिला व बालविकास प्रकल्पाचे काम कौतुकास्पद

प्रतिनिधी- आनंद काळे

बारामती- बारामती तालुक्यातील गेल्या तीन वर्षात अंगणवाडी केंद्रात राबविण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण प्रकल्पाचे कौतुकास्पद अभिनंदन महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी बारामती प्रकल्प अधिकारी यांचे कौतुकपर अभिनंदन केले.

तसेचअंगणवाडी केंद्रांना आवश्यक असणाऱ्या साहित्यासह कमी वजनाच्या बालकांसाठी नुट्रेशन व एनर्जी ड्रिंक उपलब्ध करून उपलब्ध करून देत निवृत्त सेविका व मदतनीस एलआयसीची एकरकमी रक्कम मिळण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करणार असल्याचे सूतोवाच महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर ह्यांनी बारामतीत केले.

मिथुनकुमार नागमवाड यांनी गेल्या तीन वर्षांपासून बारामतीत नवनवीन प्रकल्प हाती घेऊन मार्गी लावल्याचे कौतुक सर्व बारामतीकर करीत आहे.बारामती पंचायत समितीचे बाल विकास प्रकल्प अधिकारी मिथुनकुमार नागमवाड यांनी बालविकास प्रकल्पची धुरा हातात घेताच बालकांना सकस आहारा बरोबरच बौद्धिक,शारीरिक व मानसिक विकास होण्यासाठी विविध मानसिक खेळ राबिवणे,तालुका कुपोषण मुक्तकरण्यासाठी विशेष प्रयत्न करणे,शासनाची माझी कन्या भाग्यश्री ही योजना तळागाळातील लोकांपर्यन्त पोहचवण्यासाठी प्रयत्न करणे,माझी अंगणवाडी स्वछ अंगणवाडी,प्रत्येक अंगणवाडी परिसरात परसबाग फुलविणे,पोषण आहार कार्यक्रम, मुलींचे जन्मदर वाढविणे,बेटी बचाव बेटी पढाव कार्यक्रम राबिवणे,गरोदर माता,स्तनदा माता यांना पोषक आहार पुरवण्यासाठी प्रयत्न करणे,बालकांच्या हस्ते विविध उपक्रम राबिवणे आदी कार्यक्रम राबवित असल्याने बारामती तालुक्याचे बालविकास प्रकल्प अधिकारी श्री मिथुनकुमार नागमवाड ह्याच्या कामावर खुश होऊन महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर कौतुकाची थाप टाकली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button