Pandharpur

प्रशांतराव परिचारक यांच्या शुभहस्ते रॉबीन हुड आर्मी ला प्रतिकारशक्ती वाढवणारे होमिओपॅथिक औषधे देऊन उपक्रमास सुरवात

प्रशांतराव परिचारक यांच्या शुभहस्ते रॉबीन हुड आर्मी ला प्रतिकारशक्ती वाढवणारे होमिओपॅथिक औषधे देऊन उपक्रमास सुरवात

आरोग्य समिती सभापती विवेक परदेशी यांनी प्रशांतमालक परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली स्वखर्चातुन राबवले आहे सदर उपक्रम

प्रतिनिधी रफिक आतार

पंढरपुरातील नगरपरिषद संचलीत दवाखान्यांमध्ये मध्ये गरजु, गरीब लोक येतात‌. येथे त्यांना मोफत औषध हि दिले जाते. आरोग्य समिती सभापती विवेक परदेशी यांनी सदर दवाखान्यात भेट दिली. वैद्यकीय अधिक्षक डॉ बजरंग धोत्रे यांच्यावर फार मोठी जबाबदारी असेते, नगरपरिषदेचे सरकारी दवाखाना , काळा मारुती सेंटर येथे येणाऱ्या पेशंटची तपासणी करून ते जेथे पेशंट आयसोलेशन मध्ये आहेत गजानन मठ व नगरपरिषद संचलीत बेधर निवासातील तेथे मुख्याधिकारी व प्रांत साहेबांच्या नियोजनाने लोकांची तपासणी करतात. आरोग्य समिती सभापती यांना नगरपरिषद संचलीत दवाखान्यात पिपीई किट (Personal Protection Kit) उपलब्ध नसल्याचे समजले. पंढरपूर शहर वैद्यकीय अधिकारी डॉ बजरंग धोत्रे यांनी सुचवले आपल्याकडे थोडे पिपीई किट असणे आवश्यकता असल्याचे सुचवले. शासनाच्या पिपिई किट येणारच आहे पण आजुन आले नसल्याचे सांगितले. देव कृपेने आपल्या गावात, आपल्या जिल्ह्यात कोरोनाचा पेशंट नाही. पण अत्यावश्यक वेळी पिपिई किट उपलब्ध झाले नाही तर समस्या निर्माण होईल असे सांगितले, २० किट उपलब्ध करून द्यावे अशी त्यानी आरोग्य समिती सभापती यांना विनंती केली होती.

जावळ तालुक्यातील छोट्याशा गावात तिनं डॉक्टरांना पिपिई किट नसल्याने क्यारंटाईन मध्ये रहावे लागले. हा धोका ओळखून पंढरपुर नगरपरिषद संचलीत दवाखान्यात असे काय घडु नये यासाठी आरोग्य समिती सभापती विवेक परदेशी यांनी काळजी म्हणुन नगरपरिषद संचलीत दवाखान्यासाठी स्वखर्चाने पिपीई किट उपलब्ध करून दिले. आपले प्रमुख डॉक्टर क्यारंटाईन मध्ये राहीले पेशंट कोण तपासणार. आत्यवश्यक प्रसंगी गोरगरिबांचे काय होणार याचा विचार केला. काही सामाजिक संस्थेने अनेक किट पंढरपुरात दिलेत पण नेमके नगरपरिषद संचलीत दवाखान्यांना नजरचुकीने देण्यात आले नाही. नगराध्यक्षा साधनाताई भोसले यांनी ही पिपीई किट उपलब्ध करून देऊ असे सांगितले.

तसेच आत्यावश्यक सेवेसाठी काम करणाऱ्या नगरपरिषद प्रतिनीधी, रॉबीन हुड आर्मी प्रतिनीधी, सर्व शासन प्रतीनीधीं व पंढरपुराती पत्रकार बंधु जे घरबसल्या आपणास जगातील महत्त्वाच्या घडामोडी कळवतात अशा प्रतीनिंधींना मागणी नुसार प्रतिकारशक्ती वाढवणारे मिनिट्री ऑफ आयुष ने सुचवलेले होमिओपॅथिक औषध पंढरपुराती होमिओपॅथिक चे नामवंत डॉ संजय देशमुख व डॉ राजेश ठाकरे यांच्या मदतीने स्वखर्चाने औषध पुरवणार असे विवेक परदेशी यांनी सांगितले. आरोग्य समिती सभापती म्हणुन काम करत असताना जे प्रतिनीधी नागरिकांच्या हितासाठी फिल्ड वर जाऊन , आपल्या जिवाची पर्वा न करता किंवा आपली जबाबदारी म्हणुन काम करतात अशा प्रतीनिधीसाठी उपक्रम‌ राबवणे हे मि माझे कर्तव्य समजतो व कोरोनाच्या लढ्यात अशा महत्त्वपूर्ण लोकांची देवदुतांची मदत करण्याची संधी मिळाली हि माझे भाग्यच समजतो असे विवेक परदेशी यांनी सांगितले. फिल्डवर काम करणाऱ्या प्रतिनिधींनी डॉक्टरांच्या सल्याने यांचा लाभ ध्यावा असे आवाहन आरोग्य समिती सभापती विवेक परदेशी यांनी केले.

प्रशांतराव परिचारक यांच्या शुभहस्ते रॉबीन हुड आर्मी ला प्रतिकारशक्ती वाढवणारे होमिओपॅथिक औषधे देऊन उपक्रमास सुरवात

आमदार प्रशांतराव परिचार यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ बजरंग धोत्रे , मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, आरोग्य निरीक्षक शरद वाघमारे, नागनाथ तोडकर, दिपक सगर यांच्याशी समक्ष बोलुन आजुन कमतरता पडलेल्यास किंवा काही आत्यावश्यक मदत लागल्यास कळवावे , वेळ प्रसंगी आध्या रात्री फोन करावे त्वरित मदत पोहचवली जाईल असे सांगितले. रॉबीन हुड आर्मी चे प्रतिनीधींना अन्न धान्य कुढे वाया जातो का याचा आढावा घेऊन सर्वांनी मिळून उपाय योजना आखुन अन्न , धान्य वाया जाऊ न देता सर्व गरजु परियंत मदत पोहचवा असे सांगितले. आरोग्य समिती सभापती मुंबई विद्यापीठातुन एम.बी.ए. झाले असुन तळमळीने काम करत आहेत असे सांगून त्यांचे नियोजनाचे व कामाचे कौतुक केले. शिक्षण समिती सभापती असतानाही ज्या प्रसंगी शासनाचा निधी उपुरा पडला त्या प्रसंगी स्वखरकर्चाने मदत करुन उपक्रम राबवले असल्याचे सांगितले. मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी त्वरित चांगल्या प्रतीचे पिपीई किट उपलब्ध करून दिल्या बद्दल आरोग्य समिती सभापती चे नगरपरिषदेच्या वतींने आभार मानले.कोरोना विरुद्ध च्या लढ्यात आत्यावश्यक प्रसंगी यांचा उपयोग होईल असे सांगितले.

सदर प्रसंगी डॉ संजय देशमुख , डॉ राजेश ठाकरे, डॉ आश्वीनी परदेशी, वैद्यकिय अधिकारी राजश्री सावविठ्ठल, रॉबीन हुड आर्मी चे प्रतीनीधी अदि उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button