Rawer

पहिल्याच दिवशी कथेतभाविक भारावले. श्रीमद् भागवत कथा माणसाला निर्भय बनवते:- स्वामी डॉ.तुळशीराम गुट्टे महाराज यांचे प्रतिपादन.

पहिल्याच दिवशी कथेतभाविक भारावले.
श्रीमद् भागवत कथा माणसाला निर्भय बनवते:- स्वामी डॉ.तुळशीराम गुट्टे महाराज यांचे प्रतिपादन.

संदिप कोळी ता. रावेर

निंभोरा बुद्रुक ता.रावेर येथून जवळच दसनूर येथे सुरू असलेल्या भागवत कथेच्या पहिल्याच दिवशी पहिल्या पुष्पात स्वामी डॉ.तुळशीराम गुट्टे महाराज यांनी श्रीमद् भागवत कथा संजीवन आहे मनुष्याला मंगलमय आचरण करायला लावनारी मंगल कथा आहे. व्यासांनी भागवताची रचना केली. गणपतीने लिखान तर शंकराचा अवतार असनारे शुक मुनींनी प्रसार केला. भागवत शास्त्र प्रेम शास्त्र आहे. प्रेम व वासना यात फरक आहे, प्रेम निस्वार्थी असते तर वासना स्वार्थी असते. भागवतामुळे जीवनात परिवर्तन घडते असे स्पष्ट मत साहित्याचे गाढे अभ्यासक व प्रसिद्ध कथाकार स्वामी.डॉ.तुळशीराम गुट्टे महाराज यांनी मांडले त्या वेळी सर्व भाविक भाराऊन गेले संगितमय भागवत कथेत रममान होऊन जीवनाचे सार्थक झाल्याचे भाव त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होते. कै.सौ.सुमनबाई विठ्ठल महाजन यांच्या स्मरणार्थ आयोजीत कथेत ते बोलत होते. कथेची वेळ बदलवून रोज कथा दुपारी ०१ ते ०४ या वेळेत होनार आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button