? मोठी बातमी : विरार दुर्घटना : राज्य सरकारकडून मृताच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत तर जखमींना 1 लाख रुपये
विरार : विरारमधील वल्लभ कोव्हिड रुग्णालयाला आग लागल्याने 13 जणांचा होरपळून मृत्यू झाला. एसीचा स्फोट झाल्याचे सांगितले जात आहे. या आगीत १३ रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे, असे वसई-विरार महापालिकेच्या कोरोना कंट्रोल रुमकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान आता राज्य सरकार कडून मृताच्या वारसांना प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
याबाबत सीएमओ कडून अधिकृत ट्विट करण्यात आले की विरार येथील विजय वल्लभ रूग्णालयातील आगीत मृत्युमुखी पडलेल्या रूग्णांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख आणि गंभीर जखमी रूग्णांना प्रत्येकी १ लाख रुपये मदत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर केली आहे.
मोदींकडून 2 लाखांची मदत
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी विरार दुर्घटनेत मृत पावलेल्या लोकांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपये मदत जाहीर केली आहे तर जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपये जाहीर करण्यात आले आहेत.
शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज
दरम्यान, वसईतील वल्लभ कोव्हिड रुग्णालयातील ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या रुग्णालयाचे फायर ऑडिट झाले नव्हते, असेही बोललं जात आहे. मात्र अद्याप याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. ही आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी रवावा झाल्या आहेत. तसेच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आहेत.






