Amalner

दगडी दरवाजाचे आर्थिक राजकारण,की विकासाच्या नावाखाली ऐतिहासिक वारसा पडण्याचा चंग…

दगडी दरवाजाचे आर्थिक राजकारण,की विकासाच्या नावाखाली ऐतिहासिक वारसा पडण्याचा चंग…आजूबाजूला असलेल्या अतिक्रमणाच काय???दगडी दरवाजा अमळनेर चे ऐतिहासिक वैभव...प्रा जयश्री साळुंकेअमळनेर शहराला अनेक वर्षांपासून विशिष्ठ सांस्कृतिक, सामाजिक,ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि इतिहास आहे. या शहराने अनेक क्रांतिकारी,उद्योगपती,समाजसेवक,लेखक, कवी,कलाकार तर अनुभवलेच आहेत पण आजही मध्ययुगीन काळातील ऐतिहासिक खुणा या शहराची ओळख पटवितात.यात ब्रिटीश कालीन रेल्वे स्थानक, तहसील कार्यालय, दगडी दरवाजा,संत सखाराम वाडी संस्थान इ चा समावेश आहे. तसे पाहिले तर अमळनेरकर आपला वारसा जपण्यात अयशस्वी च ठरले आहेत. त्यात राजकीय नेत्यांपासून अधिकारी,सामान्य जनता ,विद्यार्थी सर्वांचाच समावेश आहे. अमळनेर शहरात तीन ठिकाणी हुतातम्यांची स्मारके आहेत या स्मारकांची अवस्था देखील अत्यन्त वाईट आहे.दगडी दरवाजाचे आर्थिक राजकारण,की विकासाच्या नावाखाली ऐतिहासिक वारसा पडण्याचा चंग...दगडी दरवाजा हा देखील त्यातीलच एक महत्वपूर्ण वारसा आहे.पुरातत्व खात्याचे या ऐतिहासिक वास्तू कडे लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे दुर्लक्ष झाले त्यामुळे शेवटी या दरवाजाचा एक भाग कोसळला.आणि आता या दरवाजाला पडून चौक वै बांधण्याचा घाट घातला जात आहे. येथे मांगीर बाबा यांचे ठाणे देखील आहे.एकीकडे पुरातन स्थळे जतन करण्याचे शासनाचे धोरण आहे तर दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्था अमळनेर नगरपरिषद आणि इतर लोकांकडून हा दरवाजा पाडून रस्ता मोकळा करा,वाहतुकीची कोंडी होते,इ करणे दिली जात आहेत.दगडी दरवाजाचे आर्थिक राजकारण,की विकासाच्या नावाखाली ऐतिहासिक वारसा पडण्याचा चंग...दरवाजाच्या समोर आणि आजूबाजूच्या परिसरात मोठया प्रमाणात अतिक्रमण आहे पण हे अतिक्रमण राजकीय हेतूने पाडले जात नाही.अगोदर या भागातील अतिक्रमित भाग आणि दुकाने अमळनेर नगरपरिषदेने जाहीर करावीत.दरवाजा पाडून मार्ग शोधण्या पेक्षा त्यापेक्षा अधिक विकसित तंत्र आज उपलब्ध आहेत. (ओव्हर ब्रिज)उड्डाण पूल तयार केला जाऊ शकतो. एक मार्गी रहदारी केली जाऊ शकते असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. परंतु शहर सुशोभित करण्याच्या नावाखाली ऐतिहासिक वास्तू आणि वारसा जर कोणी नष्ट करण्याचा प्रयत्न करत असेल तर जनता ऐकून घेणार तसेच इतिहास प्रेमी,अभ्यासक सहन करून घेणार नाहीत अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.अधिक माहिती साठीक्रमशः

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button