Pandharpur

बोहाळी ता .पंढरपूर या गाव महाराष्ट्र शासन आर .आर. ( आबा ) पाटील ” सुंदरगाव पुरस्काराने सन्मानित

बोहाळी ता .पंढरपूर या गाव महाराष्ट्र शासन आर .आर. ( आबा ) पाटील ” सुंदरगाव पुरस्काराने सन्मानित

रफिक अत्तार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील मौजे – बोहाळी या गावाला महाराष्ट्र शासन आर .आर. ( आबा ) पाटील ” सुंदरगाव पुरस्कार ” योजने अंतर्गत दिला जाणारा २०२०-२१ या वर्षात तालुका स्तरावर घेण्यात आलेल्या स्पर्धमध्ये निर्धारित निकाषामध्ये सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालूक्यातून सर्वाधिक गुण प्राप्त केले असल्याने बोहाळी या गावास “तालुका सुंदर गाव” म्हणून गौरविणेत आले आहे यामध्ये सन्मान चिन्ह , सन्मान पत्र , पुष्प गुच्छ व दहा लाख रुपये पुरस्कार प्राप्त झाला आहे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा . ना .दत्ता ( मामा ) भरणे यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाचा पुरस्कार स्वीकारताना बोहाळी गावचे सरपंच मा . शिवाजी पवार , राष्ट्रवादी ता . उपाध्यक्ष कल्याण कुसूमडे , शिवसेना युवा नेते बंडू घोडके , ग्रामसेवक एस .जी. डोके, लिपिक बाजीराव धूमाळ आदी पदाधिकारी उपस्थित होते यावेळी पुरस्कार प्राप्त झालेनंतर सरपंच शिवाजी पवार यांनी उपसरपंच मा .जगन्नाथ जाधव सदस्य बाळासाहेब जाधव , सौ .वैशाली शिंदे, सौ .माधवी कुसूमडे, सौ .सुशिला रणदीवे, राजेश कुसूमडे , आकाश चंदनशिवे, सौ . शुभांगी कुंभार, सौ .राणी जाधव , सौ .मोनाली घोडके पा . पु.कर्मचारी हरी माने , संगणक परी चालक सिद्धनाथ चंदनशिवे सह बोहाळी ग्रामस्थांचे आभार मानले

संबंधित लेख

Back to top button