Maharashtra

धडगाव तालुक्यातील तोरणमाळ गावातील पिप्री पाडा येथील लोकांचे पाण्या साठी हाल….प्रशासनाचे दुर्लक्ष….

धडगाव तालुक्यातील तोरणमाळ गावातील पिप्री पाडा येथील लोकांचे  पाण्या साठी हाल….

प्रशासनाचे दुर्लक्ष….

धडगाव तालुक्यातील तोरणमाळ गावातील पिप्री पाडा येथील लोकांचे पाण्या साठी हाल....प्रशासनाचे दुर्लक्ष....

नंदुरबार प्रतिनिधी 

संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात दुष्काग्रस्त परिस्थिती आहे. त्यातल्या त्यात जळगांव नंदुरबार ,धुळे याठिकाणी भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना वणवण भटकावे लागत आहे अशीच परिस्थिती अनेक आदिवासी पाडे, गावे याठिकाणी असून जण सामान्य माणसाला मैलों मैल पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. 

धडगाव तालुक्यातील तोरणमाळ गावातील पिप्री पाडा येथील लोकांचे पाण्या साठी हाल....प्रशासनाचे दुर्लक्ष....

नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील तोरणमाळ गावातील पिप्री पाडा येथील लोकांचे  पाण्या साठी हाल झाले आहेत.थेंब थेंब पाण्यासाठी महिलांना पुरुषांना कसरत करावी लागत आहे. पाणी मिळविन्यासाठी खोलवर खड्डे करून थोडे पाणी मिळेल या आशेवर लोक तासनतास वाट पाहत आहेत.मेहनत घेत आहेत. सर्वात जास्त हाल आदिवासी महिला वर्गाचे आहेत कारण स्वयंपाका पासून ते लहान मोठ्या प्रमाणात पाणी त्यांना लागत असते त्यामुळे पाण्यासाठी त्यांची जास्त भटकंतीहोत असल्याचे चित्र पिपरी पाणी गावात दिसत आहे. ह्या तालुक्यात ह्या वर्षी लोक ७०% मजुरी साठी स्थलांतरित होत आहेत.मात्र हा तालुका दुष्काळी जाहीर झाला नाही.

धडगाव तालुक्यातील तोरणमाळ गावातील पिप्री पाडा येथील लोकांचे पाण्या साठी हाल....प्रशासनाचे दुर्लक्ष....

या सर्व पार्श्वभूमीवर प्रशासन डोळ्यावर कातडी ओढून बसले आहे की मुद्दाम दुर्लक्ष करत आहे हे समजेनासे झाले आहे.कोणत्याही प्रकारच्या सुविधा या आदिवासीपाड्यां वर पोहचविल्या जात नसून प्रशासनाने धृतराष्ट्रा ची भूमिका घेतली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button