Amalner

एस टी कर्मचारी अमळनेर यांच्या बेमुदत संपाला मनसेचा जाहीर पाठिंबा

एस टी कर्मचारी अमळनेर यांच्या बेमुदत संपाला मनसेचा जाहीर पाठिंबा

अमळनेर दि 9 रोजी अमळनेर एस टी कर्मचारी अमळनेर आगार परिसरात आपल्या प्रमुख मागण्यासाठी बेमुदत उपोषण मांडले आहे , अमळनेर एस टी कर्मचारी पुढील मागण्यांसाठी आमरण उपोषणाला बसले त्यात
1)शासनात विलीनीकरण करा. 2)वार्षिक वेतन वाढीचा दर 2टक्के वरून 3 टक्के करावा.
3) महागाई भत्ता 28 टक्के प्रमाणेच मिळावा.
4)घर भाडे राज्य शासनाप्रमाणे 8/16/24 दराप्रमाणे च मिळावा.
5)कामगार करारा प्रमाणे सर्व कामगारांना नियमित वेतन मिळायला पाहिजे.
6)दिवाळी बोनस 15हजार रु मिळावा.
7)सण उचल 12500रु मिळावा. या सर्व प्रमुख मागण्यासाठी जामनेर एस टी कर्मचारी बेमुदत उपोषणाला बसलेली असताना सदरील मागण्या रास्त असल्याने अमळनेर महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्याकडून
जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे ,वरील मागण्या मान्य न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रत्यक्ष आंदोलनात मनसे स्टाईलने सहभागी होणार आहे
यावेळी
मनसे जळगाव जिल्हा अध्यक्ष मुकुंदा भाऊ रोटे, तालुका अध्यक्ष अधिकार पाटील, मनसे सैनिक संदीप पाटील, माजी जिल्हाप्रमुख सुनील भामरे, विद्यार्थी सेनेचे सुमित पाटील, जितेंद्र बिऱ्हाडे, सचिन भालेराव, तेजस कोळी, बाबा ग्रुपचे अध्यक्ष धनु भाऊ सोलंखे, अरुण गव्हाणे आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button