Paranda

बँकेतुन काढलेली ४ लाखाची रक्कम चोरीला – परंडा येथिल घटना

बँकेतुन काढलेली ४ लाखाची रक्कम चोरीला – परंडा येथिल घटना

परंडा तालुका प्रतिनिधी सुरेश बागडे

परंडा ( सा.वा )दि .२१

परंडा येथिल एसबीआय बॅकेतुन काढलेली निवृत्त सैनिकाची ४ लाखाची रक्कम नजर ठेऊन असलेल्या चोरट्यांनी मोटार सायकल ला लावलेली पैश्याची पिशवी अज्ञात चोरट्यांनी लंपास केली हि घटणा शुक्रवार दि २० रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास परंडा येथे भर बाजारात घडली .

या बाबत अधिक माहिती अशी की सिरसाव ता .परंडा येथिल निवृत्त सैनिक हमीद पठाण यांचे दोन मुले देखील सैन्य दलात असाम आणी जम्मु मध्ये ड्यूटी वर असुन ईखलास याने पगारीवर ५ लाखाचे कर्ज घेऊन बार्शी येथे घर जागा घेण्या साठी वडीलांच्या नावावर पैसे पाठवीले होते .

हमीद पठाण यांनी दि २० रोजी मुलांने पाठविलेली ४ लाखाची रक्कम एसबीआय बॅकेतुन काढले व पीशावीत ठेऊन पिशवी मोटार सायकलच्या हुकाला लाऊन जुनी आडत लाईन मार्गाने निघाले रस्त्यावर गर्दी व वाहन असल्याने मोटार सायकल स्लो असल्याने नजर ठेऊन असलेल्या अज्ञात चोरट्यांनी पठाण यांची पैश्याची पिशवी काढून घेऊन पसार झाले या प्रकरणी पठाण यांनी परंडा पोलिसात फिर्याद दिली असून रात्री उशीरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू होती.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button