अत्यंत पारदर्शी पद्धतीने कापूस नाव नोंदणी सुरू.
सोमवारपासून कापूस मोजणी सुरू होणार, पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांनी केली नोंदणीसाठी गर्दी.
रजनीकांत पाटील अमळनेर
अमळनेर : शुक्रवारी सकाळी साडेपाच वाजेपासून नाव नोंदणी प्रक्रियेसाठी मोठी शेतकऱ्यांची भली मोठी रांग लागली होती. पहिल्याच दिवशी इतक्या मोठ्या प्रमाणावर रांग लावून गर्दी केल्याचे चित्र बाजार समितीच्या आवारात दिसले.
कापूस खरेदीसाठी सन 2020 -2021 चा सातबारा पिकपेरा लावलेला आवश्यक, सोबत आधारकार्ड झेरॉक्स, बँक पासबुक झेरॉक्स आणि सातबारा उताऱ्यावर मोबाईल नंबर टाकणे आवश्यक आहे. शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजता आमदार अनिल भाईदास पाटील यांनी बाजार समितीच्या आवारातील कापूस नाव नोंदणी केंद्राला भेट दिली. यावेळी किसान काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा सुभाष पाटील, तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष गोकुळ बोरसे बाजार समिती प्रशासक गुलाबराव पाटील आदि उपस्थित होते.
शुक्रवारी सकाळी बाजार समिती व पणन महासंघाच्या कर्मचाऱ्यांनी नाव नोंदणी रजिस्टर कोरे असल्याचे शेतकऱ्यांना दाखवून खात्री देऊन नाव नोंदणी सुरू केली. त्यामुळे कापूस खरेदी प्रक्रिया पारदर्शी आणि कोणत्याही वाशिल्याशिवाय पार पडणार आहे. तालुक्यातील कुणीही शेतकरी असला तरी त्याला रांगेतच नाव नोंदणी करावी लागेल. त्यामुळे कोणत्याही सामान्य शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही.शेतकऱ्यांशी बोलतांना आमदार पाटील यांनी नोंदणी झालेल्या शेतकऱ्याचा कापूस खरेदी केला जाईल याची हमी यावेळी दिली.
शेतकऱ्यांनी देखील व्यापाऱ्यांना आपला सातबारा उतारा व आवश्यक कागदपत्रे देऊ नये दिल्यास त्यामुळे उत्पन्नात वाढ होऊन शासकीय योजनांपासून वंचित राहावे लागेल यासाठी सावधानता बाळगणे गरजेचे असल्याचे प्रा सुभाष पाटील यांनी सूचना केली. बाजार समितीत अचूक वजन काटा व मोजमाप देखील परदर्शीपणे राबविले जाणार असून याचा फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा.
सोमवार पासून नाव नोंदणी- नंबर लावलेली शेतकऱ्यांची नावे मोजमापसाठी बाजार समितीच्या बोर्डवर लावण्यात येतील तसेच डिस्प्लेवर देखील प्रसिद्ध केली जाईल त्याप्रमाणे शेतकऱ्यांची वाहने सुलभतेने मोजमाप होतील. सोमवारपासून कापूस खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी प्रशासक व सहाय्यक निबंधक गुलाबराव पाटील यांनी दिली.






