Nashik

एसएनडी अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियंता दिन उत्साहात साजरा, देशसेवेत योगदान द्या :यादव

एसएनडी अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियंता दिन उत्साहात साजरा,

देशसेवेत योगदान द्या :यादव

नाशिक शांताराम दुनबळे.
नाशिक-जीवनात येणाऱ्या समस्यांना सोडवण्यासाठी अभियंत्यांनी अभियांत्रिकीमधील नाविन्यपूर्ण व समाजोपयोगी संशोधनावर भर देऊन देशाची सेवा करण्यासाठी श्रेष्ठ गुणवत्ता जोपासावी, असे मनोगत प्राचार्य डॉ. डी. एम. यादव यांनी केले. बाभुळगाव येथील एस. एन. डी. अभियांत्रिकी महाविद्यालय व संशोधन केंद्रामध्ये अभियंता दिन उत्साहाने साजरा करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. भारतरत्न डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त अभियंता दिन साजरा करण्यात आला. महावितरणचे येथील उपकार्यकारी अभियंता मिलिंद जाधव प्रमुख पाहुणे होते. सर्वप्रथम प्राचार्य डॉ. यादव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व डॉ. विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. पूनम व अक्षदा पडताळे या विद्याथ्यांनी स्वागत गीत म्हटले. यावेळी मिलिंद जाधव म्हणाले की, अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी पुस्तकी ज्ञानासोबत प्रात्यक्षिक ज्ञान उपयोगी पडत असते. एक चांगला अभियंता तोच आहे, जो पुस्तकी ज्ञान प्रत्यक्षात आणू शकतो. प्रथम वर्ष विभागप्रमुख डॉ. विवेक चौधरी म्हणाले की, सर विश्वेश्वरय्या यांचे संपूर्ण जीवनचित्र अभियंत्याना सकारात्मक ऊर्जा देणारे असून, अभियंत्यांनी ज्ञानाचा वापर देशाच्या प्रगतीसाठी व मानव कल्याणासाठी करावा. कार्यक्रमाल मान्यवरांची उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांपैकी अक्षदा पडताळे व वैष्णव देवरे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाला गणेश गवळी, सिव्हील विभागप्रमुख डॉ. उबेद अन्सारी, विद्युत विभागप्रमुख डॉ. पवन टापरे, कॉम्पुटर विभागप्रमुख डॉ. उमेश पवार, एमबीए विभागप्रमुख डॉ. व्ही. एन. उबाळे, मेकॅनिकल विभागप्रमुख डॉ. पुंडलीक पाटील, आय.टी. विभागप्रमुख पी. पी. रोकडे, प्रथम वर्ष विभागप्रमुख डॉ. व्ही. एस. चौधरी, अकॅडेमिक डीन प्रा. ए. पी. घोडके तसेच प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. सर्वांचे स्वागत गुलाब पुष्प देऊन करण्यात आले. सूत्रसंचालन प्रा. सचिन सावंत यांनी केले तर आभार प्रा. अमित सोळंकी यांनी मानले. संस्थेचे संचालक रुपेश दराडे यांनी इंजिनिअर्स डे निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button