Pandharpur

श्री सतीश भुई यांची “ग्राम संवाद सरपंच संघ “महाराष्ट्र राज्य सरपंच संघाच्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड

श्री सतीश भुई यांची “ग्राम संवाद सरपंच संघ “महाराष्ट्र राज्य सरपंच संघाच्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड
रफिक आतार पंढरपूर
पंढरपूर : महाराष्ट्रात राज्यस्तरावर स्थापन करण्यात आलेल्या व कार्यरतअसलेल्या “ग्राम संवाद सरपंच संघ” महाराष्ट्र राज्य सरपंच संघाच्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी श्री सतीश सुरेश भुई यांची बिनविरोध निवड करण्यात आली पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरोलीतील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य व ओबीसी फाउंडेशन युवा चे जिल्हाध्यक्ष सतीश भुई यांनी पिराची कुरोली पंचक्रोशी मध्ये अनेक सामाजिक उपक्रम राबवून तरुण युवकांचे संघटन केले आहे, त्यांचा सुसंस्कृत स्वभाव त्याची काम करण्याची पद्धत अडचणीत असलेल्या लोकांना मदतीला धावून जाणे तसेच बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक अडचणी दूर करणे त्यांनी अल्पावधीतच केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या योजना ग्रामपंचायत मध्ये राबवून सर्वसामान्य जनतेला न्याय व हक्क देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत असा हा सामाजिक कार्यकर्ता असल्याची समाजामध्ये ओळख असल्याने गावात करत असलेल्या कार्याची दखल घेत “ग्राम संवाद सरपंच संघ” महाराष्ट्र राज्य चे प्रदेशाध्यक्ष आजिनाथ धामणे उपाध्यक्ष प्रमोद भगत सचिव विशाल लांडगे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन त्यांना पश्चिम महाराष्ट्र ग्राम संवाद सरपंच संघाच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली;यावेळी सतीशदादा म्हणाले की, महाराष्ट्रातील सर्व आजी-माजी सरपंच ,उपसरपंच ,सदस्य सामाजिक कार्यकर्ते यांचे संघटन करून “ग्रामसंवाद सरपंच संघ”वाढवण्याकरता व बळकट करण्याकरता महाराष्ट्रातील सर्व सरपंच,उपसरपंच ,सदस्य तसेच लहान मोठ्या वंचित तळागाळातील व्यक्तीपर्यंत पोचून त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाबद्दल तसेच न्याय व हक्क मिळवून देणे करता नेहमीच प्रयत्नशील असेल गावात वेगवेगळ्या समाज उपयोगी योजना आणून विकास करण्याचा प्रयत्न करीन त्यांच्या निवडीबद्दल माढा मतदार संघाचे आमदार मा.बबनदादा शिंदे सहकार शिरोमणी कारखान्याचे चेअरमन श्री कल्याणराव काळे विठ्ठल सहकारी कारखान्याचे चेअरमन श्री भगीरथ दादा भालके माजी जिल्हा परिषद सभापती श्री संजय पाटील तंटामुक्ती अध्यक्ष परमेश्वर लामकाने माजी संचालक पंढरीनाथ लामकाने संचालक बाळासाहेब कौलगे फिषेरमन काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष नंदकुमारभुई भोई समाज युवा क्रांती दल राज्य संघटक बंडू भोई गजानन भुई तानाजी भुई पांडुरंग भुई संतोष भुई सतीश भुई अनील भुई तुकाराम भुई अनिल सोनवले ग्रामसेवक भोसले साहेब किसन भुई तसेच पंचक्रोशीतील सर्व पदाधिकारी ग्रामस्थ व मित्र परिवार यांच्याकडून अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा चा वर्षाव केला जात आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button