Amalner

Amalner: तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन उत्साहात संपन्न

अमळनेर तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन उत्साहात संपन्न

अमळनेर राष्ट्रीय ग्राहक दिन निमित्ताने अमळनेर तहसील कार्यालयात ग्राहकदिन तहसिलदार मिलिंद कुमार वाघ यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीच्या सभागृहात उत्साहात साजरा करण्यात आला. ग्राहक पंचायतच्या उपस्थित मान्यवरांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.कार्यक्रमाच्या सुरवातीला संगठण मंत्र म्हणून ग्राहक पंचायत सचिव कपिला मुठे यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली. कार्यक्रमाचे प्रास्तविक अमळनेर ग्राहक पंचायत तालुका अध्यक्षा ऍड भारती अग्रवाल यांनी केलं व ग्राहक पंचायतचे कार्य कश्या रीतीने होते व “consumer know your rights” या वाक्याचे अर्थ स्पष्ट करत ग्राहकांना सूचित केले. कपिला मुठे व मकसूद बोहरी यांनी मार्गदर्शन करत कार्यक्रमाची सांगता झाली.या प्रसंगी अमळनेर तालुक्यातील उत्कृष्ट आधार सिडिंगचे काम करणाऱ्या ग्रामीण व शहरी भागातील रेशन दुकानदार यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले.

कार्यक्रमास ग्राहक पंचायत चे सर्व सदस्य उपस्थित होते.याप्रसंगी ग्राहक कल्याण फाउंडेशन तर्फे जिल्हाध्यक्ष हेमंत भांडारकर,ग्राहक कल्याण तालुका उपाध्यक्ष व माजी तहसीलदार आर जी चव्हाण, एडवोकेट कुंदन साळुंके, एडवोकेट आर्.व्ही. निकम, पत्रकार अबिद शेख तर अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर तर्फे सौ स्मिता चंद्रात्रे ,ज्योती भावसार, विजय शुक्ल, प्रसिद्धीप्रमुख जयंतलाल वानखेडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन पुरवठा निरीक्षण अधिकारी संतोष बावणे व पुरवठा निरीक्षक अनिल पाटील यांनी केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button