Nashik

लासलगाव ला जय जनार्दन अनाथ आश्रमात डाॅ.ए.पी.जी अब्दुल कलाम यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी.

लासलगाव ला जय जनार्दन अनाथ आश्रमात डाॅ.ए.पी.जी अब्दुल कलाम यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी.

शांताराम दूनबळे नाशिक


नाशिक : लासलगाव येथे जय जनार्दन अनाथ आश्रम येथे भारताचे माजी राष्ट्रपती ङाॅ ए पी जे अब्दुल कलाम यांची पुण्यतिथि माणुसकी सोशल फाउंडेशन संचलित
ग्राहक(उपभोक्ता)संरक्षण समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष दादाभाऊ केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली लासलगाव येथे
ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समिती आणि नाझ ए वतन
बहुउद्देशिय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने
जय जनार्दन अनाथ आश्रम येथे
पुण्यतिथी
निमित्ताने कार्यक्रम आयोजित केला होता. याप्रसंगी लासलगावचे उपसरपंच श्री.अफजलभाई शेख,तसेच मुस्लीम उत्कर्ष समितीचे अध्यक्ष श्री.सादीकभाई शेखमनमाड प्रमुख पाहुणे उपस्थित
होते.प्रथम कलामसाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून,
प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमास सुरुवात झाली त्यानंतर
मान्यवरांचे शाल व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात
आले.
ग्राहक संरक्षण समीती च्या नाशिक जिल्हा महिला
सचीव सौ.अनिता गंधे यांनी कलामसाहेबांविषयी अगदी
सोप्या भाषेत,सर्वांना समजेल अशी महत्वपुर्ण माहिती
सांगितली
श्री.अल्ताफभाई यांनीही मनोगत व्यक्तं केले.
यानिमित्ताने
ग्राहक संरक्षण समिती शहर अध्यक्ष सौ.पुष्पाताई दरेकर यांनी आश्रमातील मुलांना केळीवाटप
केले.गंधे मॅडम यांनी मुलांसाठी पुस्तके आणि चॉकलेट्स दिली.
याप्रसंगी ग्राहकांच्या समस्या व आधिकार याविषयीची
चर्चाही झाली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ.संगीता गुंजाळ यांनी केले.आभारप्रदर्शन नाझ ए वतन संसथेच्या अध्यक्षा,तसेच
ग्राहक समितीच्या निफाड तालुका उपाध्यक्ष सौ.फरीदा काजी यांनी केले.
हा कार्यक्रम करणेसाठी फरीदा काझी,आश्रमाचे संचालक
श्री.दिलीप गुंजाळ,श्री. मीरान पठाण यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमासाठी शेख भाभी,शिल्पा सुक्ते, कांकरीया भाभी,सोनवणेताई,उपसरपंच शेजवळ,इ.मान्यवर उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button