?️ Big Breaking… एमपीएससी परीक्षांचे नवे वेळापत्रक जाहीर..
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्य सेवा पूर्व परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आलेल्या आहेत.
राज्य सेवा पूर्व परीक्षा -2020, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा – 2020, महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा – 2020 या परीक्षांच्या नव्या तारखा झाल्या आहेत.
त्यानुसार राज्य सेवा पूर्व परीक्षा – 2020 रविवार दि.14 मार्च 2021, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा – 2020 शनिवार दि. 27 मार्च 2021
तर महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा -2020 रविवार 11 एप्रिल 2021 रोजी होणार आहे.
दरम्यान, कोरोना पार्श्वभूमीवर परीक्षेच्या आयोजनाच्या अनुषंगाने आयोगाकडून वेळोवेळी आढावा घेण्यात येणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.






