यवतमाळ जिल्हयात कळंब येथे पंचायत समिती कार्यालयात स्व वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त कृषी दिन वसंतराव नाईक कृषी जैवतंत्रज्ञान महाविदयालयाचे प्राध्यापक मा डॉ रवींद्र सातभाई यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला .
प्रतिनिधी रुस्तम शेख
या प्रसंगी डॉ रविन्द्र सातभाई यांनी स्व वसंतराव नाईक यांच्या कार्या विषयी सविस्तर माहीती दिली
-या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीचे सभापती मा पूजाताई शेळके, प स सदस्य महादेवराव काळे ,गटविकास अधिकारी सुशील संसारे , पशुधन विकास अधिकारी डॉ रवींद्र मांडेकर इत्यादी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते
याप्रसंगी प्रास्ताविक कळंब पंचायत समितीचे कृषी अधिकारी सोनाली चव्हान यांनी केले तर आभार प्रदर्शन विस्तार अधिकारी रमेश केळकर यांनी मानले
या कार्यक्रमात तुषार महाजन साहेब , अजय शेळके, दै लोकदुतचे प्रतिनिधी रूस्तम शेख इ व्यक्ती व कर्मचारी उपस्थित होते
विशेष म्हणजे या कार्यक्रमात सोशल डिस्टन, प्रत्येकाने मास्क चा वापर करून निययाचे काटेकोरपने पालन केले असल्याची माहिती आमचे प्रतिनिधी रूस्तम शेख यांनी दिली






