नागरिकांना दोन वेळचे दर्जेदार जेवण पुरवणारा देवमाणूस आमदार सचि कल्याणशेट्टी
प्रतिनिधी कृष्णा यादव
अक्कलकोट, आमदार सचि कल्याणशेट्टी हे कोणताही गाजावाजा न करता गोरगरीब व गरजू कुटुंबाला दररोज दोन वेळचे दर्जेदार देऊन पुरवीत आहेत. गेल्या 10 ते 12 दिवसांपासून दर्जेदार जेवण पुरवण्याचे काम आजही सुरूच आहे. अक्कलकोटचे लोकप्रिय आमदार सचिन कल्याणशेट्टी हे अक्कलकोटमध्ये दररोज सकाळी व संध्याकाळी असे मिळून दोन वेळचे अतिशय चांगल्या दर्जाचे जेवण जवळजवळ दीड ते दोन हजार गरजू कुटुंबांना रोज आपल्या 20 ते 25 कार्यकर्त्यांमार्फत घरपोच पुरवीत आहेत.
सध्या देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती गंभीर बनली असताना अनेक जण केवळ प्रसिद्धीसाठी किलो अर्धा किलो धान्य वाटप करून स्वतःची पाठ स्वतः थोपटून घेत असताना अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी हे मात्र कोणत्याही प्रसिद्धीपासून दूर राहत आणि आपल्या मतदारसंघातील नागरिक हा आपलाच आहे, असे म्हणून गेल्या 10 ते 12 दिवसापासून सतत या कामात कोणताही खंड न पडू देता अतिशय चांगल्या दर्जाचे जेवण तयार करून ते गरजू कुटुंबापर्यंत पोचवीत आहेत. या कामासाठी त्यांनी स्वतंत्र यंत्रणा तयार केली असून त्यांच्याकडे असलेल्या कार्यकर्त्यांमधील मोजक्याच 20 ते 25 कार्यकर्त्यांवर व लोकप्रिय नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली आहे.
नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी यांच्या उत्कृष्ट नियोजन व निगराणीखाली हे जेवणाचे दोन वेळचे डबे गरजू व दररोज सकाळी आणि संध्याकाळी घरोघरी पोहोचवण्याचे अतिशय नियोजनबद्ध काम केले जात आहे.
गेल्या दहा दिवसापासून कोणत्याही प्रसिद्धीपासून अलिप्त राहून आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी यांचे गोरगरिबांना दोन वेळचे जेवण करण्याचे हे काम अतिशय पुण्याचे आणि संकटाच्या काळात जनतेच्या पाठीशी उभे राहण्याचे आहे असे मत अनेक गरीब कुटुंबातील अनेक व्यक्तीने आमच्या प्रतिनिधीशी बोलून दाखविले.
*सचिनदादांना जनतेचा आशीर्वाद आहे*
“आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी आणि नगरसेवक मिलानदादा कल्याणशेट्टी अक्कलकोट मधील व अक्कलकोट तालुक्यातील कुटुंबाची अडचण ओळखून त्यांना दररोज दोन वेळचे दर्जेदार जेवण पुरण्याचे काम कोणतीही प्रसिद्ध न करता करत आहेत. हा त्यांच्या मनाचा फार मोठा मोठेपणा असून जनतेचा त्यांना आशीर्वाद आहे”
*भौरम्मा कोळी महिला नागरिक अक्कलकोट*






