भाजपा किसान मोर्चा तालुकाध्यक्षपदी राहुल महाजन
मुबारक तडवी रावेर
रावेर : भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा (शेतकरी आघाडी) च्या तालुका अध्यक्ष पदी मोठे वाघोदे.तालुका रावेर येथील राहुल गोपाल महाजन यांची निवड करण्यात आली आहे. महाजन हे भाजपचे सक्रिय सदस्य असून यापूर्वी त्यांनी अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. त्या अनुषंगाने किसान मोर्चाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. नियुक्ती पत्रात माजी मंत्री गिरीश महाजन, भाजप जिल्हाध्यक्ष राजू मामा भोळे, खासदार रक्षा खडसे, जि.प. अध्यक्ष रंजना पाटील, किसान मोर्चा चे उत्तर महाराष्ट्र चे संपर्कप्रमुख सुरेश धनके, तालुकाध्यक्ष राजन लासूरकर, माजी जि.प. उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, भाजप जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या बळकटीसाठी काम करण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत. शुक्रवारी भाजपा तालुका कार्यलयात सुरेश धनके यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले असुन यावेळी पद्माकर महाजन,राजन लासुरकर श्रीकांत महाजन,अमोल पाटिल,हरलाल कोळी,प्रल्हाद पाटिल,जितू पाटिल,महेश चौधरी सर्व पदाधिकारी व सदस्य ऊपस्थित होते.






