Faijpur

फैजपूर शहर व परिसरातून बैल जोड्या सह पशुधनाची चोऱ्या मध्ये वाढ शेतकरी हवालदिल भाजपचा आंदोलनाचा इशारा

फैजपूर शहर व परिसरातून बैल जोड्या सह पशुधनाची चोऱ्या मध्ये वाढ शेतकरी हवालदिल भाजपचा आंदोलनाचा इशारा

सलीम पिंजारी फैजपूर यावल

फैजपूर : फैजपूर शहर व परिसरातील कष्टकरी शेतकरी वर्गाचा आधार असलेल्या सर्जा राजा बैल जोडी सह लाखो रुपयांचे पशुधनाचे चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे दिवसाआड पशुधनाचे चोऱ्या होत आहे दोन दिवसापूर्वीच येथील प्रगतशील शेतकरी नितीन राणे यांची लाखो रुपये किमतीची बैलजोडी रात्री अज्ञात चोरट्यांनी लांबविली आहे या बाबी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सपोनि प्रकाश वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली रोहिदास ठोंबरे शेख मकसूद आदी पोलिस करीत आहे कोरोनाच्या महाकठीण प्रसंगात शेतकरी अमाप वाढीव वीज बिले शेतीमालाच्या होणाऱ्या वारंवार चोऱ्या अव्वाच्या सव्वा शेतमजुरी कर्जाचा डोंगर अशा एक ना अनेक समस्यांमुळे जीवन मरणाच्या खाईत जीवन जगणाऱ्या कष्टकरी शेतकऱ्यांच्या मुख्य आधार असलेले पशुधनाच्या वाढत्या चोऱ्यांमुळे त्यांना आत्महत्येस प्रवृत्त करीत आहे मात्र याकामी पोलीस प्रशासनाला या पशुधन चोरांच्या मुसक्या आवळण्यात अपयश येत आहे ्यामुळे शेतकर्‍यांसह सर्वसामान्य नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे
या गंभीर बाबी भारतीय जनता पार्टी फैजपूर यांच्यावतीने फैजपुर पोलीस स्टेशन येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखेडे यांची समक्ष भेट घेत निवेदन देत पशुधन वाढत्या दौऱ्यामुळे शेतकरी समस्या मांडल्या असून या विरोधात आंदोलन चा इशारा दिला आहे, या बाबी वानखेडे व पोलीस प्रशासनाने पशुधन चोरीच्या रॅकेटचा लवकर पर्दा पाश करून त्यांच्या मुसक्या आवळण्याचे आश्वासित केले आहे
भाजपच्या या शिष्टमंडळाला मध्ये भाजपाचे शहराध्यक्ष अनंता नेहेते माजी नगराध्यक्ष निलेश राणे तालुका उपाध्यक्ष नितीन नेमाडे सरचिटणीस संजय सराफ पिंटूभाऊ तेली जितेंद्र वर्मा संजय भावसार रामा होले यासह शेतकरी उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button