Sangali

वीर एकलव्य जगातील एक महान धनुर्धारी – राजेंद्र पाडवी

वीर एकलव्य जगातील एक महान धनुर्धारी – राजेंद्र पाडवी

प्रतिनिधी / सांगली – कांतीलाल झिरवळ

वीर एकलव्य भारतातीलचं नव्हे तर,जगातील एक महान धनुर्धारी होते. वीर एकलव्य द्रोणाच्या शिष्यापेक्षाही वरचढ होता. असे मत बिरसा क्रांती दल सांगली जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाडवी यांनी व्यक्त केले.
ते वीर एकलव्य जयंती निमित्त कार्यक्रमात बोलत होते, पाडवी म्हणाले, एकलव्याचे कौशल्य, गुणवत्ता पाहून द्रोणाचे शिष्य लज्जित झाले,असे महाभारतात म्हटले आहे. द्रोणानी आपल्या शिष्याना जे प्रत्यक्ष ज्ञान दिले होते, त्यापेक्षा अधिक ज्ञान एकलव्याकडे होते. वीर एकलव्य अर्जुनापेक्षा वरचढ होऊ नये म्हणून अंगठ्याची गुरुदक्षिणा मागणी केली असावी. वीर एकलव्याने स्वेच्छेने अंगठा कापून दिला हेही खरे असू शकत नाही. काळ इतका बद्दलल्यानंतरही काही लोक तरुणांच्या समोर अन्यायापुढे झुकण्याचे आदर्श ठेवू इच्छितात, यामागे त्यांची वर्चस्ववादी भावना आहे.हे उघड आहे.जो गुरू शिष्याचे अंगठयाची गुरुदक्षिणा मागणी करतो.शिष्य म्हणून स्वीकार करत नाही. तरी सुध्दा काही लोकांकडून गुरू-शिष्याचे अतूट नाते सांगितले जाते, हे चुकीचे आहे.त्यावेळी बिरसा क्रांती दलाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाडवी, तालुका संपर्क प्रमुख महेंद्र गावीत, विश्वर चौधरी, अतुल पावरा, युवराज फसाळे, नामदेव डाकोरे उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button