Mumbai

? Big Breakingप्रफुल्ल पटेल यांना पुन्हा एकदा ईडीचे समन्स

? Big Breaking..प्रफुल्ल पटेल यांना पुन्हा एकदा ईडीचे समन्स

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांना पुन्हा एकदा अंमलबजावणी संचालनालयाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. पटेल यांच्यावर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा नातेवाईक इकबाल मिर्ची याच्यासोबत आर्थिक आणि जमीन व्यवहारप्रकरणी त्यांचे नाव समोर आले आहे.

ड्रग्स माफिया इकबाल मिर्चीचे आयएसआशी कनेक्शन असल्याचे ईडीच्या तपासात उघड झाले आहे. या प्रकरणात ईडीने एक आरोपपत्र दाखल केले होते. मिर्चीची बायको हाजरा आणि मुले जुनेद आणि आसिफ यांच्यासह आणखी काही जणांवर हे आरोपपत्र दाखल करण्यात आले होतं.

दरम्यान, पटेलच्या मिलेनियम डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडने 2006-07 मध्ये ‘सीजे हाऊस’ नावाची इमारत बांधली आणि तिचा तिसरा आणि चौथा मजला मिर्चीची पत्नी हजारा इक्‍बाल यांना हस्तांतरित करण्यात आला.
ज्या जागेवर इमारत बनविली गेली ती मिर्चीची असल्याचे सांगितले जाते. ‘मनी लॉंन्डरिंग’, ड्रग्सची तस्करी आणि खंडणीखोरीच्या गुन्ह्यांमधून ही जमीन विकत घेण्यात आल्याचा तपास अधिकाऱ्यांचा दावा आहे.
या करारात काही चूक नसून, हा व्यवहार स्वच्छ आणि पारदर्शक असल्याचे मालमत्तेच्या कागदपत्रांमधून पटेल आणि त्यांच्या पक्षाने स्पष्ट केले होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button