Faijpur

फैजपूरमध्ये लॉक डाउन मुळे सर्वत्र शुकशुकाट

फैजपूरमध्ये लॉक डाउन मुळे सर्वत्र शुकशुकाट

फैजपूर

लॉक डाउन मुळे सर्वत्र शुकशुकाट दिसत असून वेळेच्या बंधना नुसार जनजीवन पूर्णत विस्कळीत झाले असल्याचे चित्र दिसत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की गेल्या काही दिवसापासून सर्वत्र कोरोना विषाणू रोगामुळे सर्वत्र थैमान घातले असताना त्याचा परिणाम दुसरीकडे होऊ नये आणि कोरोना रोगाचा फैलाव होऊ नये म्हणून फैजपूर शहरात लॉकडाउन च्या पूर्णत: परिणाम दिसून येत आहे. कोरोना अशा विषाणू रोगा च्या फैलाव होऊ नये म्हणून त्याच्या प्रमुख हेच मार्ग असल्याचे सर्वत्र माहितीनुसार नागरिकांच्या निदर्शनात आले असल्यामुळे लॉक डाउनला 100% फैजपूर शहरात याच्या परिणाम दिसून येत आहे.

फैजपूरमध्ये लॉक डाउन मुळे सर्वत्र शुकशुकाट

जीवन आवश्यक वस्तू वेळेनुसार ठरल्याप्रमाणे खरेदी-विक्री घेताना नागरिक आपापल्या घरी रवाना होत असून लॉक डाउन च्या सर्वत्र पालन करीत असल्याचे चित्र असून कोणतीही खरेदी करीत असताना या काळात कोणत्याही दुकानदाराने जास्त किंवा अतिरिक्त पैसे घेतल्यास त्याच्यावर फैजपुर पोलीस स्टेशन तर्फे कारवाई करण्याचा इशारा फैजपूर पोलिसांनी दिला असून महामारी च्या काळात असे आढळल्यास किंवा तक्रार आल्यास कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची पोलिसांकडून सांगण्यात आले तसे पालन सुद्धा व्यवसायिकांनी करावे अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडून केली जात आहे लॉक डाउन च्या फैजपूर सह परिसरात शुकशुकाट दिसत असल्यामुळे येथील प्रांत अधिकारी डॉक्टर अजित थोरबोले तसेच डीवायएसपी नरेंद्र पिंगळे तसेच पालिकेचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण , फैजपूर पोलिस स्टेशनचे एपीआय प्रकाश वानखडे यांच्यासह त्यांचे सर्व कर्मचारी अतोनात परिश्रम घेत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button