Mumbai

Mumbai Diary: बाल सुधार गृहातील धक्कादायक प्रकार..शिक्षकाला मार मी तुला शरीरसुख देईन… शिक्षिकेची अल्पवयीन विद्यार्थ्याचा लैंगिक छळ…

Mumbai Diary: बाल सुधार गृहातील धक्कादायक प्रकार..शिक्षकाला मार मी तुला शरीरसुख देईन… शिक्षिकेची अल्पवयीन विद्यार्थ्याचा लैंगिक छळ…
भिवंडी येथील बालसुधारगृहातील ४५ वर्षीय शिक्षिकेने १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलाचा लैंगिक छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी संबंधित महिला शिक्षिकेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी शांतीनगर पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भिवंडी शहरातील कचेरीपाडा येथे राज्य सरकारच्यावतीने बालसुधारगृह चालवण्यात येते. या बालसुधारगृहाचे व्यवस्थापन भिवंडीतील एका संस्थेमार्फत होते. या सुधारगृहात मुलांच्या देखभालीसह शिक्षणाची देखील सोय केली आहे आणि त्यासाठी काही शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

बालसुधारगृहातील १७ वर्षीय मुलाला १७ आणि २८ सप्टेंबर रोजी महिला शिक्षिकेने शरीर सुखाची ऑफर दिल्याचे समोर आले आहे. महिलेने या मुलाला तु इतर मुलांना भडकव आणि मास्तरांवर हात उचल तरच तुला शरीरसुख देईन, अशी ऑफर दिली होती. त्यानंतर या शिक्षिकेने मुलाचे लैंगिक शोषण केले.

सहकाऱ्यांसोबत झालेल्या वादातून शिक्षिकेला तीन महिन्यांपूर्वी अधीक्षकांनी निलंबित केले होते. राज्याच्या महिला आणि बालकल्याण विभागाकडून चौकशी करण्यात आली, ज्या दरम्यान एका पॅनेलने १७ वर्षीय कैद्यासह अनेकांचे जबाब नोंदवले. ज्या मुलाचा शिक्षकाने लैंगिक छळ त्याने सांगितले की, शिक्षिकेने त्याला इतर शिक्षकांना मारहाण करण्यास सांगितले होते, ज्याच्या बदल्यात तिने त्याला लैंगिक सुविधा देण्याचे वचन दिले होते.

दरम्यान संबंधित महिला शिक्षिकेने संस्था संचालक आणि बालसुधारगृहाच्या उपाधीक्षकाच्या विरोधात विनयभंगाचा आरोप करत तक्रार केली आहे. या दोघांनी आठ महिन्यापूर्वी अश्लील व्हिडिओ दाखवल्याचे या महिलेने तक्रारीत म्हटले आहे. महिला शिक्षिकेने आपल्याला जातीवाचक शिवीगाळ देखील केल्याचे म्हटले आहे. संबंधित शिक्षिकेला निलंबित करण्यात आले असून या प्रकरणी जिल्हा महिला बाल विकास समितीच्या अध्यक्ष आणि सदस्यांकडून चौकशी करण्यात येत आहे.

पीडित मुलाच्या वक्तव्याच्या आधारे अधीक्षकांनी मंगळवारी शिक्षकाविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल केला. शांतीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक एस.ए.इंदलकर यांनी सांगितले की, दोन्ही पक्षांच्या तक्रारींच्या आधारे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button