चोपडा (प्रतिनिधी-सचिन जयस्वाल)येथील विवेकानंद विद्यालयात प्रतिवर्षाप्रमाणे “आषाढी एकादशी” व दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला.संस्थेचे अध्यक्ष डॉ.विजय पोतदार,सचिव अॅड.रवींद्र जैन, डॉ.निता जैस्वाल,मुख्याध्यापक नरेंद्र भावे, संजय सोनवणे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. विठठ्लाची आरती उपशिक्षक प्रसाद वैद्य,वासंती नागोरे, वैशाली आढाव, वंदना वनारसे यांनी गायली.उपशिक्षिका साधना बोरसे यांनी विद्यार्थ्यांना संतांच्या गोष्टीरूप माहिती व आषाढी एकादशीचे महत्त्व सांगितले. सर्व विद्यार्थ्यांनी व ज्योती अडावदकर यांनी अभंग गायन केले. उपशिक्षक संजय सोनवणे यांनी पसायदान म्हणून घेतले. इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची भव्य दिंडी चोपडा शहरातून काढण्यात आली.दिंडीत लेझीम पथक,टाळ गजर, विद्यार्थ्यांचा अभंग गायनाचा समूह, इयत्ता सातवी अ/ ब वर्गाचे समाज प्रबोधनाचे फलक व वृक्षदिंडी हे दिंडीचे आकर्षण ठरले.विद्यार्थ्यांनी विविध संतांच्या वेशभूषा परिधान केल्या होत्या.तसेच अनेक विद्यार्थी वारकरी वेशात येऊन विठ्ठलाचा जयघोष करत होते.या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचलन उपशिक्षिका आशा चित्ते तर फलक लेखन व छायाचित्रण कलाशिक्षक राकेश विसपुते यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व विभागाच्या सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमात सर्व विभागाचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
संबंधित लेख
Health : इंस्टा.. सोशल मीडियावर रील बघत तासन् तास निघून जातात..! कळतच नाही..! तर मग हा आहे ब्रेन रॉट…काय आहे ब्रेन रॉट…जाणून घ्या दुष्परिणाम
6:45 pm | December 14, 2024
Breaking: सत्ता हाती येताच अजित पवार यांच्या आयकर विभागाने जप्त केलेल्या मालमत्तेला केले मुक्त…
5:43 pm | December 7, 2024
Tribute to Dr. Babasaheb Ambedkar: संविधान रचणाऱ्या सदस्यांमध्ये एकमेव दलित महिला..दाक्षायणी वेलायुधन
8:29 pm | December 6, 2024
Weather Alert: थंडी कमी होणार.. फेंगल वादळामुळे राज्यात अवकाळी पावसाचा इशारा..
6:37 pm | December 2, 2024
हे पण बघा
Close - Weather Alert: थंडी कमी होणार.. फेंगल वादळामुळे राज्यात अवकाळी पावसाचा इशारा..6:37 pm | December 2, 2024
- Amalner: अमळनेरकरांनो आरोग्य सांभाळा, हवेचे गुणवत्ता खालावली.. डी ए धनगर5:52 pm | December 2, 2024



