पाणी फाउंडेशन आयोजित समृद्ध गाव स्पर्धेतील सोयाविन प्रश्नमंजुषा स्पर्धेतील जळगाव जिल्ह्यामधील विजेत्यांना बक्षीस वाटप
जळगांव : महाराष्ट्रामध्ये सोयाविन प्रश्नमंजुषा स्पर्धा घेतली गेली होती त्यामध्ये जळगाव जिल्ह्यातून अमळनेर तालूक्यातिल नगाव बु गावातील संजयगिर गोसावी यांनी प्रथम क्रमांक पटकावला होता त्यांना पाणी फाउंडेशन च्या वतीने सायकल कोळपे बक्षीस म्हणून देण्यात आले तसेच नगाव बु गावातील जळगाव द्वितीय क्रमांक मिळवणारे गणेश गोसावी गुरुजी यांना आठ कामगंध सापळे व ल्यूर देऊन सन्मान करण्यात आला हे दोन्ही शेतकरी पाणी फाउंडेशन च्या सोयाबीन शेती कार्यशाळेच्या माध्यमातून गेली दोन महिने ऑनलाईन प्रशिक्षण घेत आहेत त्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून प्रभावित होऊन यांनी आपल्या शेतीमध्ये कपास या पिका ऐवजी चार चार एकर प्रत्येकी सोयाबीन या पिकाची पेरणी केली आहे पाणी फाउंडेशनच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या शेती कार्यशाळेचा अज्ञानातून आपल्या शेतामध्ये सोयाबीनचा प्रयोग हे शेतकरी करत आहेत व समृद्धीच्या दिशेने वाटचाल करत आहे त्यांच्या पुढील वाटचालीस लक्ष लक्ष शुभेच्छा ??????






