Maharashtra

अहो आश्चर्यच चांप्यात कोणतेही प्रशिक्षण न घेता आदिवासी युवकांनी बनविला

अहो , आश्चर्यच ‘ चांप्यात कोणतेही प्रशिक्षण न घेता ‘आदिवासी युवकांनी बनविला डी.जे

प्रतिनिधी अनिल पवार

चांपा जगात कोरोना संसर्गाच्या जाळ्यात अडकून अनेकांनी आपला जीव गमावला , देशात व राज्यात वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारने 14एप्रिल पर्यंत सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले होते .वाढत्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने केंद्रातच नव्हे तर राज्यातही 3 मे पर्यंत सर्वत्र लॉकडाऊनची घोषणा मा .पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली .

नागपूर जिल्ह्यात सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे चांप्यातील रहिवासी कृष्णा इरपाते या आदिवासी युवकांनी कोणतेही प्रशिक्षण न घेता ,जिल्ह्यात एका महिन्याच्या जवळपास लॉकडाऊन असल्यामुळे बैठे’ बैठे क्या करे, करना है , कुछ काम .या गाण्यातून ग्रामीण भागात राहणाऱ्या कृष्णा इरपाते या आदिवासी युवकांनी खरोखरंच हे म्हण सत्य केले आहे .घरीच बसल्या कोणतेही प्रशिक्षण न घेता स्वताच्या मेहनतीने बनविला डी.जे .

उमरेड तालुक्यातील चांपा येथील रहिवासी कृष्णा इरपाते या आदिवासी युवकांनी ही कामगिरी करून दाखविली , घरची आर्थिक परिस्थिती बरी नसल्याने पोटाची खरगी भरण्यासाठी तो एका खासगी ट्रकवर चालक म्हणून काम करतो व मिळेल त्या पैशात आपले व कुटुंबीयांचे कसेबसे उदरनिर्वाह करतो,.

कोरोनामुळे जिल्ह्यात सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे एका महिन्यापासून ट्रक वाहतूक पूर्णतः बंद असल्याने हाताला कोणतेही काम नसल्याने घरी बसल्या आपल्या मित्र परिवाराकडून डी .जे .बनविण्यासाठी लागणारे आवश्यक ते साहित्य गोळा केले व स्वतःच्या मेहनतीने कमी खर्चात डी.जे बनविला .त्याच्या या कामाचे गावातच नव्हे तर सर्वत्र कौतुक होत आहे .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button