संपादकीय प्रा जयश्री साळुंके

सामाजिक…. जाणून घेऊ या तृतीयपंथी व्यक्तीचा संघर्ष आणि यश…..

सामाजिक….
जाणून घेऊ या तृतीयपंथी व्यक्तीचा  संघर्ष आणि यश…..
कपाळावर भलं मोठं कुंकू….करारी चेहरा…
बहुभाषिक,उत्तम आई,…आत्मविश्वासू नजर…जिद्द,चिकाटी आणि संघर्षाची तयारी….

सामाजिक.... जाणून घेऊ या तृतीयपंथी व्यक्तीचा संघर्ष आणि यश.....

संपादकीय प्रा जयश्री साळुंके
मुंबई……
तृतीयपंथीना आपण  किन्नर/हिजडा/छक्का अशा अनेक नावांनी संबोधतो नाही जवळजवळ हिणवतोच. सामान्य इतर माणसांसारखीच  तीही माणसं आहेत, त्यांनादेखील अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा प्रमाणे  इतर भावना,मन  आहेत हे  नेहमीच आपण विसरतो किंवा सरळसरळ नाकारतो. त्यांनाही त्यांची नावे असतात त्या नावाने त्यांना हाक मारली त्यांच्याशी मैत्री केली तर त्यांना चांगलंच वाटेल.परंतु वर्षानुवर्षे असून तृतीयपंथी व्यक्तींकडे समाज वाईट घृणे च्या दृष्टीने पाहतो.ही भावना बदलण्यासाठी  तृतीयपंथी चे प्रश्न,समस्या समजून घेण्याचा आणि समजावून सांगण्याचा प्रयत्न सर्वत्र  झाला पाहिजे. त्यांच्या कडे बुद्धिमत्ता, हुशारी,सामाजिक कार्य करण्याची क्षमता,हे सर्व आहे.

सामाजिक.... जाणून घेऊ या तृतीयपंथी व्यक्तीचा संघर्ष आणि यश.....

असच एक नाव जे सम्पूर्ण देशातच नव्हे तर जागतिक पातळीवर गाजलं ते म्हणजे गौरी सावंत…..जाणून घेऊ तिचा संघर्ष आणि यशाची कहाणी……
गौरी सावंत मुंबई, भारतातील मधील एक ट्रान्सजेंडर एक्टिव्ह आहे.  ती साक्षी चार चौघीची दिग्दर्शक आहे जी एचआयव्ही / एड्स ग्रस्त आणि ट्रान्सजेंडर लोकांना मदत करते.  विक्सने दिलेल्या जाहिरातीमध्ये तिला वैशिष्ट्यीकृत केले गेले होते. तिला महाराष्ट्रात निवडणूक आयोगाची सदिच्छा दूत बनविण्यात आले. 
 तिचा  जन्म पुण्यात झाला.  तिची आई नऊ वर्षांची असताना निधन झाली आणि तिचे पालनपोषण तिच्या आजीने केले.  तिचे वडील पोलिस अधिकारी आहेत.  वयाच्या 18 व्या वर्षी तिला वडिलांनी घर सोडण्यास सांगितले. 
 गौरीने 2000 मध्ये साक्षी चार चौकी ट्रस्टची स्थापना केली. स्वयंसेवी संस्था सुरक्षित लैंगिकतेस प्रोत्साहन देते आणि ट्रान्सजेंडर लोकांना सल्ला देतात. 2014 मध्ये, ती ट्रान्सजेंडर लोकांच्या दत्तक अधिकारांसाठी भारतीय सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणारी पहिली ट्रान्सजेंडर व्यक्ती ठरली.  ती राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (एनएएलएसए) प्रकरणात याचिकाकर्ता होती ज्यात सर्वोच्च न्यायालयाने ट्रान्सजेंडरला तृतीय लिंग म्हणून मान्यता दिली.   गायत्रीच्या आईचे एड्समुळे निधन झाल्यानंतर गौरीने २०० 2008 मध्ये गायत्री नावाच्या मुलीला दत्तक घेतले. 
  

सामाजिक.... जाणून घेऊ या तृतीयपंथी व्यक्तीचा संघर्ष आणि यश.....

 2017 मध्ये, गौरीला विक्सने दिलेल्या जाहिरातीमध्ये वैशिष्ट्यीकृत केले होते.  ही जाहिरात विक्सच्या ‘टच ऑफ केअर’ मोहिमेचा भाग होती आणि यात गौरी आणि तिच्या दत्तक मुलीची कहाणी दर्शविली गेली.
गौरीने एका मुलाखतीत वैद्यकीय सेवा देताना देखील दुजाभाव करत असल्याचं सांगितलं  खरं तर तिने जो अनुभव सांगितला तो हादरवून टाकणारा होता. निदान जे सुशिक्षित आहेत, जे विज्ञान जाणतात अशा डॉ कडून तरी ही मुळीच अपेक्षा नाही.  हे चित्र बदलण्यासाठी आपण नक्की पुढाकार घ्यायला हवा, 

सामाजिक.... जाणून घेऊ या तृतीयपंथी व्यक्तीचा संघर्ष आणि यश.....
  • आपण हे करू शकतो….
  • जो दृष्टिकोन आहे तो आपण एकमेकांना सांगून चर्चा करून निश्चित पणे हळूहळू बदलवू शकतो. लगेच हा बदल होणार नाही याची आपल्यालाच काय त्यांनादेखील कल्पना आहे पण आपण एक सुरुवात तर करू शकतो. 
  • सार्वजनिक ठिकाणी तृतीयपंथी व्यक्ती दिसल्या तर त्यांच्याकडे पाहून कमेंट्स पास करू नयेत. मदत करणे शक्य नसले तर निदान टिंगल  करू नये.
  • कुठेही या व्यक्ती दिसल्या/भेटल्या की दूर पळू नये. त्यांच्याशी बोलावं. आपल्याकडे पैसे नाहीत हे नीट समजावून सांगितल्यास ते समजून घेतात किंवा तुम्ही द्याल तेवढंच घेऊन निघून जातात हा माझा स्वतःचा अनुभव आहे.
  •  त्यांची नोकरी करण्याची कितीही इच्छा असली तरी कुणीही त्यांना कामावर ठेवत नाहीत आणि तसं केल्यास ग्राहक किंवा इतर सहकारी त्या मालकालाच वाळीत टाकण्याची शक्यता अधिक असते.त्यांना उदर निर्वाहाची साधने उपलब्ध करून देणे ही शासनाची देखील जबाबदारी आहे. कारण तेही या सरकार निवडीत मतदान प्रक्रियेत समाविष्ट  असतात. 
  • आपल्या  संपर्कात येणाऱ्या सर्वांचं यांच्याबद्दलचं मत बदलण्याचा प्रयत्न करा. आधी स्वतःच मत बदलावा त्यांच्याबद्दलची योग्य माहिती त्यांना द्या. 
  • त्यांनाही मन, भावना आहेत. आपल्यासारखी त्यांचीही काही स्वप्नं,प्रश्न  असतील.
  • सहानुभूती नको, फक्त हवा आहे विश्वास,प्रेम,आणि आपुलकी ..मित्र/मैत्रीण म्हणून साद द्या,  काही वर्षांनी नक्कीच चित्र बदललेलं असेल. आपल्या पुढच्या पिढीला आपलाही अभिमान वाटेल, न डगमगता,न घाबरता वेळीच एक पाऊल पुढे टाकल्याबद्दल….

Leave a Reply

Back to top button