Amalner

अमळनेर: रॉयल रायडर सायकलिस्ट ग्रुपची मंगळगग्रह मंदिरास भेट

रॉयल रायडर सायकलिस्ट ग्रुपची मंगळगग्रह मंदिरास भेट

अमळनेर

नासिक येथील रॉयल रायडर सायकलिस्ट ग्रुप नाशिकहून शेगावला जातांना २५ रोजी श्री मंगळग्रह मंदिरात थांबून त्यांनी दर्शन घेतले. मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे शरद कुलकर्णी यांनी सर्व सायकलिस्ट यांचे स्वागत करून मंदिराविषयी माहिती दिली .सर्व सायकल स्वारांना चहा-नाश्ता
देऊन त्यांना पुढील प्रवासास शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी १०० महिला व पुरुष सायकलिस्ट उपस्थित होते. हे सर्व जण सलग पाच वर्षापासून नासिक ते शेगांव सायकल प्रवास करीत आहेत.
याप्रसंगी नासिक रायडर ग्रुपचे डॉ. आबा पाटील,अरुण काळे,राजाभाऊ पोटमे,संतोष पवार, एलआयसी डिओ नितीन पाटील,संजय बागुल,अनिल महाले,महेंद्र पाटील आदी उपस्थित होते.

या ग्रुप मधील दिव्यचक्षु सायकलिस्ट सागर बोडके व त्यांचे सहकारी विशाल शेळके हे गेल्या तीन वर्षांपासून सोबत डबलशिट सायकलिंग करीत आहेत. आतापर्यंत त्यांनी पंढरपूर, शिवनेरी,शेगाव सह अनेक ठिकाणी सायकलवर प्रवास केला आहे.सर्वत्र त्यांचे विशेष कौतुक होत असते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button