Amalner

अमळनेर: चोऱ्यांचे सत्र थांबेना..!चारचाकी,दुचाकी सह दुकानात चोरी…!

अमळनेर: चोऱ्यांचे सत्र थांबेना..!चारचाकी,दुचाकी सह दुकानात चोरी…!

अमळनेर तालुक्यात चोऱ्यांचे प्रमाण वाढत जात आहे. दिवसाढवळ्या दुचाकी,शेळ्या मेंढ्या,गायीचोरीस जात आहेत तसेच घरफोडी होत आहेत.आता चारचाकी , दुचाकी आणि दुकानात एकाच दिवशी चोरी झाल्याची घटना घडली आहे. चोरट्यांनी एकूण 2 लाख 60 हजारांचा ऐवज लंपास केला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की अमळनेर शहरातील न्यू प्लॉट येथील पियुष गोविंद चित्ते यांच्या घराबाहेरील 2 लाख रु किमतीची चारचाकी क्र MH 19 CZ3280 ही गाडी दि 7 डिसेंबर रोजी चोरून नेली.पियुषच्या
फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला असून पो उपनिरीक्षक अनिल भुसारी तपास करीत आहेत.

तर दुसऱ्या घटनेत तुळजाई हॉस्पिटल बाहेरील साई मेडिकल व जनरल स्टोअर्स चे सनी सुरेश पाटील त्यांच्या दुकानाची कडी तोडून दुकानातील 20 हजार रु
रोख व 10 हजार रु किमतीचा डीव्हीआर चोरट्याने चोरून नेला आहे.
फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

तिसऱ्या घटनेत गुणवंत श्रीराम पाटील रा स्वामी विवेकानंद कॉलनी,पैलाड ह्याची हेडावे रस्त्यावर बालाजी ऑइल मिल जवळ शेताच्या बांधावर लावलेली ३० हजार रुपये किमतीची मोटरसायकल क्र.MH 19 CC 8228 ही चोरट्याने चोरून नेली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा
दाखल करण्यात आला असून तपास हे कॉ सुनील पाटील करीत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button