Bollywood: Pathan: पठाण मधील ह्या 7 चूका..!लॉजिक लाऊच नका..! डोकं आपटेल..!
मुंबई तब्बल चार वर्षांनंतर शाहरुख खानच्या चाहत्यांसाठी सूवर्ण काळ आला आहे. शाहरुख खान, जॉन अब्राहम आणि दीपिका पादुकोण स्टारर ‘पठाण’ सिनेमा सुपरहिट झाला. शाहरुखने याआधी कधीही असे अॅक्शन सीन केले नव्हते. त्यामुळेच चाहत्यांना एक वेगळा शाहरुख आवडला. सिनेमातील अॅक्शन सीन पाहून आभाळ कोसळेल किंवा पृथ्वी तुटून पडेल असे वाटते, पण शाहरुखचा एक केसही तुटत नाही. सिनेमातील हे तुफान अॅक्शन सीन हॉलिवूडचे टॉप अॅक्शन डिरेक्टर केसी ओनील, क्रेग मॅक्रे आणि सुनील रॉड्रिग्ज या दिग्गजांनी दिग्दर्शित केले आहेत. त्यांच्या दिग्दर्शनाचा प्रभाव सिनेमात सुरुवातीपासून शेवटपर्यंत दिसून येतो. मात्र, या सगळ्यामध्ये सिनेमात असे काही सीन आहेत, जे चाहत्यांचं डोकं दुखायला लागेल. कुठेतरी अतिशय निरर्थक सीन आहेत तर कुठे दिग्दर्शकाने केलेली चूक दिसते.
शाहरुखचा ‘पठाण’ चालणं फार गरजेचं होतं. एक म्हणजे बॉलिवूडचे कोणतेच सिनेमे चालत नव्हते आणि दुसरं म्हणजे हिंदी बॉक्स ऑफिसवर दिवसेंदिवस दाक्षिणात्य सिनेमांचा दबदबा दिसून येत होता. पठाणने दाक्षिणात्य सिनेमाला टक्कर देणारी कमाई केली. सिनेमातील अॅक्शन सीक्वेन्स ‘फास्ट अँड फ्युरिअस’ सीरिज, ‘मिशन इम्पॉसिबल’ फ्रँचायझीसह अनेक मार्वल सिनेमांची आठवण करून देतात. आज आपण सिनेमातील त्या सीनबद्दल बोलणार आहोत जिथे निर्मात्यांनी एकतर चूक केली आहे किंवा अॅक्शनच्या नावाखाली निरर्थक गोष्ट चाहत्यांना दिली.
हेलिकॉप्टरला बसच्या छताला दोरीने बांधले
आता हेलिकॉप्टरचा तो सीन आठवा, जिथे जॉन अब्राहम आणि शाहरुख खान म्हणजेच जिम आणि पठाण यांच्यात बसच्या वर उभे राहून जबरदस्त भांडण झाले. यादरम्यान जॉन अब्राहमची म्हणजेच जिमची ताकद पाहा, तो दोन हेलिकॉप्टर बसच्या छताला दोरीने बांधतो. यावर तुम्ही काय म्हणाल.शाहरुख खानचा हेलिकॉप्टरचा सीन
शाहरुख खानचा पहिला अॅक्शन सीन, जिथे एक दहशतवादी त्याला इतकी मारहाण करतो की त्याचा चेहरा रक्ताने माखलेला असतो. मग अचानक तो एकट्याने सर्वांना मारतो. एवढंच नाही तर गेट बंद झाल्यानंतरही तो बंद दरवाजातून चॉपर घेऊन पळून जातो. चॉपरवर इतक्या मशीनगन आणि गोळ्या असतानाही त्याचा एक कसही तुटत नाही. फार डोकं लावू नका कारण तो पठाण आहे.

सलमान खानच्या एण्ट्रीचा सीन
शाहरुख खानचा तो सीन जेव्हा शाहरुख खान रशियात ‘रक्तबीज’ चोरी करताना पकडला जातो. त्यानंतर शाहरुखला पकडून ट्रेनमधून नेले जाते. अचानक ट्रेनच्या छतावर काही लोखंडी वस्तू आदळल्याचा आवाज येतो आणि सलमान ट्रेनचं छत तोडून आत प्रवेश करतो. एखादा माणूस ट्रेनवर उडी मारतो आणि त्याचा लोखंड मारल्यासारखा आवाज येणं हे अजिबात पचनी पडणारं नव्हतं. बरं, गंमत म्हणजे सलमान वरून उडी मारतो आणि त्याच्या हातातील कॉफीचा एक थेंबही सांडत नाही.
जेव्हा पठाण आणि टायगर एकत्र येतात
ट्रेनचा सीन हा गुरुत्वाकर्षणाच्या नियमांना आव्हान देणारा आहे. जिथे शाहरुख आणि सलमान दोघे मिळून शत्रूशी लढतात. ते मशिनगनसारख्या हल्ल्यातून वाचतात आणि शत्रूंचं हेलिकॉप्टर खाली पाडण्यात यशस्वी होतात. पण जेव्हा हेलिकॉप्टर ट्रेनच्या पूलावर कोसळतं तेव्हा ट्रेनचे डबे एकामागून एक दरीत पडू लागतात, पण शाहरुख आणि सलमान इतक्या वेगाने धावतात की ते संपूर्ण ट्रेन दरीत कोसळूनही ट्रॅकवर योग्य उडी मारतात. आता पठाण आणि टायगर एकत्र आल्यावर अजून काय होणार..

दीपिकाचा फोबिया मध्येच येतो आणि जातो
दीपिकाला लहानपणापासूनच पाण्याचा फोबिया असतो कारण तिने आपल्या वडिलांचा मृत्यू डोळ्यांसमोर पाहिलेला असतो. बर्फावर स्केटिंग करताना झालेल्या स्फोटामुळे दीपिका थंड पाण्यात बुडते. यादरम्यान शाहरुख पाण्यात उडी मारून दीपिकाला वाचवतो. पण मग दीपिका केसरी मोनोकिनीमध्ये पाण्याखाली पोहते तेव्हा तिचा फोबिया कुठे जातो?
सर्वात मोठा विनोदी सीन
तुम्ही मार्वल चित्रपटांमध्ये सुपरहिरोज आकाशात उडताना पाहिले असतील, परंतु शाहरुख खान आणि जॉन अब्राहमचा पाठलाग करतानाचा सीन ज्या प्रकारे आकाशात दाखवण्यात आला आहे, तो सर्वात विनोदी सीन आहे. यात दोघंही आकाशात लढताना दिसतात. हिंदी प्रेक्षकांना या गोष्टी पचायला थोडा वेळ लागेल. आकाशातला विमानाचा वेग आणि त्यात चष्मा न घालता केलेले फाइट सीन.. माशाअल्लाह.

नक्की कुठे झाली जखम
सिनेमात दीपिका पादुकोणला एका सीनमध्ये पोटाच्या डाव्या बाजूला जखम होते. मात्र जेव्हा शाहरुख खान तिला मलमपट्टी करतो तेव्हा तो संपूर्ण कमरेला मलमपट्टी करतो. चित्रीकरणावेळी दिग्दर्शक कदाचित विसरला असेल की दीपिकाच्या नक्की कोणत्या बाजूला गोळी लागते. पण आता शाहरुखचा सिनेमा म्हटल्यावर या सर्व गोष्टी विसरायच्याच.







