Maharashtra

गोरगरीबांना धान्य वाटप करुन मनसेने साजरी केली आंबेडकर जयंती

गोरगरीबांना धान्य वाटप करुन मनसेने साजरी केली आंबेडकर जयंती

प्रतिनिधी रफिक आतार

पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने गरीब कुुटुंबाना धान्याचे वाटप करताना दिलीप धोत्रे, रमेश हाके, बापू निकम,शशिकांत पाटील, सिध्देश्वर गरड, बालाजी रोंगे, लखन घाडगे आदी.पंढरपूर,ता.14- खर्डी (ता.पंढरपूर) येथील गोरगरीब लोकांना धान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करुन मनसेने महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची 129 वी जयंती साधेपणाने साजरी केली. येथील कुटुंबांना मनसेचे प्रदेश सरचिणीस दिलीप धोत्रे यांच्या वतीने ही मदत देण्यात आली.

देशात आणि राज्यात कोरोनाचे महासंकट आले आहे. अशा संकटाच्या काळात लोकांनी घराबाहेर न पडता घरातच डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्याचे तर कार्यकर्त्यांनी गोरगरीब लोकांना मदत करावी असे आवाहन मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केले आहे. राज ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतीसाद देत पंढरपूर येथील मनसेचे प्रदेश सरचिणीस दिलीप धोत्रे यांनी आज खर्डी (ता.पंढरपूर) येथील गोरगरीब,निराधार आणि गरजू लोकांना अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूचे वाटप करुन डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने 30 एप्रिल तर केंद्र सरकारने 3 मे पर्यंत लाॅकाडाऊन वाढवला आहे. लाॅकडाऊन असल्यामुळे ग्रामीण व शहरी भागातील गोरगरीब व मजूर लोकांचे हाल सुरु आहेत. अशा गरजू लोकांच्या मदतीसाठी मनसेने पुढाकार घेतला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून मनसेेच्या वतीने गरजू व गोरगरीब लोकांना धान्याचे वाटप केले जात आहे.आज डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने खर्डी येथील गोरगरीब व गरजू कुुटुंबांना अन्नधान्य वाटप केले. मनसेेच्या या अनोख्या व समाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
कार्यक्रमास सरपंच रमेश हाके, तलाठी श्री.मुजावर, मनसेचे तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, शहर अध्यक्ष सिध्देश्वर गरड, उपाध्यक्ष महेश पवार, पोलिस पाटील बालाजी रोंगे, बापू निकम,लखन घाडगे, अर्जून जाधव,संजय रणदिवे आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button