जनसंघाच्या उपाध्यक्षपदी सौ दीपाली चौधरी व संदीप पाटील यांची निवड
सलीम पिंजारी
फैजपूर येथील युवा सामाजिक कार्यकर्त्या व खान्देश नारीशक्ती च्या अध्यक्षा सौ दिपाली चौधरी झोपे यांची व सामाजिक कार्यकर्ते संदिप धर्मराज पाटील यांची जन संघ सेवक मंच च्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.सौ.दिपाली चौधरी या अनेक वर्षांपासून नारीशक्ती गृप च्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात काम करीत आहेत त्यांच्या या कार्याची दखल घेऊन जन संघाचे अध्यक्ष शशांक कुमार सिंह यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र मुंबई प्रदेशाध्यक्ष राजूभाई वैष्णव यांनी ही निवड सर्वानुमते जाहीर केली.या निवडीबद्दल दिपाली चौधरी यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी स्वागत केले व शुभेच्छा दिल्या.






