India

?️ ठोस प्रहार ब्रेकिंग.. लॉक डाऊन…कौटुंबिक हिंसाचारात वाढ..केली जातेय extra सेक्स ची मागणी…

?️ ठोस प्रहार ब्रेकिंग.. लॉक डाऊन… कौटुंबिक हिंसाचारात वाढ..केली जातेय extra सेक्स ची मागणी…

प्रा जयश्री दाभाडे

संपूर्ण देशात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव पार्श्वभूमीवर लॉक डाऊन आणि अन लॉक ची प्रक्रिया वेगवेगळ्या परिस्थितीनुसार अंमलात आणली जाते आहे. ह्या दोन्ही प्रकियांचा खूप मोठा परिणाम जन सामान्यांच्या जीवनावर होत आहे. आर्थिक, राजकीय,सामाजिक, सांस्कृतिक, अध्यात्मिक घटकांवर दृश्य स्वरूपात परिणाम दिसून येत आहेत. तर असे काही समाजातील घटक आहेत ज्यांच्या जीवनावर अप्रत्यक्षपणे मोठे परिणाम लॉक डाऊन आणि अन लॉक ह्या दोन्ही प्रक्रियांचे होत आहेत. यातील सर्वात जास्त मोठा परिणाम जर झाला असेल तर तो स्त्री वर्गावर होत आहे.?️ ठोस प्रहार ब्रेकिंग.. लॉक डाऊन...कौटुंबिक हिंसाचारात वाढ..केली जातेय Extra सेक्स ची मागणी...एकूण लोकशाहीचा निम्मे आधार स्तंभ किंवा समाजाचा अत्यन्त महत्वाचा घटक म्हणजे स्त्री आणि हा भारतीय समाजात पुरुष प्रधान संस्कृती मुळे नेहमीच दुर्लक्षित राहिला आहे. आजही 22 व्या शतकात देखील आम्हाला महिला सबलीकरणासाठी प्रयत्नशील असावे लागते. उपक्रम राबवावे लागतात.आजही स्त्री सर्वच स्तरात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रगती करत आहे. कार्य करत आहे. पण पुरुष प्रधान संस्कृती च्या मनातील स्त्री चा दुय्यम दर्जा काही केल्या नष्ट होत नाही. दृष्टिकोन बदलत नाही परिणामी अनेक वाईट अनिष्ट गोष्टींना स्त्रियांना बळी पडावे लागते.लॉक डावूनच्या काळात जर सर्वात जास्त शारीरिक, मानसिक त्रास झाला असेल तर तो महिलांना झाला आहे. सर्वच घरातील सदस्य घरात..अनेक प्रकारच्या खाद्य पदार्थांच्या मागण्या,ऑनलाईन कार्य,मोलकरीण नसल्यामुळे सर्व जास्तीच्या कामांचा बोझा महिला वर्गावर येऊन पडला.या लॉक डाऊन आणि अन लॉक च्या काळात महिलांवरील कौटुंबिक हिंसाचारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.?️ ठोस प्रहार ब्रेकिंग.. लॉक डाऊन...कौटुंबिक हिंसाचारात वाढ..केली जातेय Extra सेक्स ची मागणी...जळगांव जिल्ह्याचा विचार केल्यास 30 ते 40% कौटुंबिक हिंसाचारात वाढ झालेली दिसून आली आहे. जवळपास 200 महिलांनी फोन वरून आपल्या समस्या मांडल्या आहेत.Extra सेक्सची मागणी…या सर्वांमध्ये extra सेक्स ची मागणी वाढत असल्याचेही निदर्शनास आले आहे. त्याच प्रमाणे अनैसर्गिक सेक्स ची मागणी देखील वाढली असल्याचे दिसून आले आहे. त्याच प्रमाणे नको असलेल्या प्रेग्नसी ला महिला बळी पडत आहेत.

पिंक” जास्त प्रमाणात उपलब्ध होत नसल्यामुळे देखील अनवांटेड प्रेग्नसी चे प्रमाण वाढत आहे. या सर्व प्रकाराला वय वर्षे 25 ते 40 या वयोगटातील महिला बळी पडत आहेत.अपूर्ण वैद्यकीय सुविधा मुळे देखील अनेक महिलांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.भारतीय महिलांच्या समस्यांचे देखील त्यांच्या वर्गाप्रमाणे वेगवेगळे स्तर आहेत. आपण हे वेगवेगळे स्तर वेगवेगळ्या माध्यमातून आणि दृष्टिकोनातून तपासण्याचा, अभ्यासण्याचा प्रयत्न करणार आहोत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button