Amalner

अमळनेर : स्व.गोपीनाथ मुंढे साहेबांची जन्म जयंती साजरी..

अमळनेरात स्व.गोपीनाथ मुंढे साहेबांची जन्म जयंती साजरी..

अमळनेर आज दि १२ डिसेंबर ला अमळनेर येथील अंबाऋषि टेकडीवर स्व. गोपीनाथ मुंढे साहेबांची जन्म जयंती साजरी करण्यात आली. सुरुवातीला स्व.गोपीनाथ मुंढे साहेबांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. नंतर आलेल्या सर्वांनी श्रमदान केले. त्यात गड्डे खोदणे, पाण्यासाठी चर निर्माण करणे, काटेरी झाडे तोडणे व पाणी व्यवस्थापन करणे इ. कामे करण्यात आली.नंतर अंबाऋषि टेकडी ग्रुप सोबत सर्वांनी वृक्षारोपण केले.बारा निंबाची रोपे तर एक वडाचे असे एकूण तेरा वृक्षारोपण करण्यात आले. निंबाची बारा रोपे श्री प्रमोद लटपटे तर एक वडाचे रोप श्री जगदीश वंजारी यांनी उपलब्ध करून दिले. समाजबांधवांची व अंबाऋषि टेकडी ग्रुपची अल्पोपहार व्यवस्था सर्व महिलांनी मिळून केली. त्यासाठी लागणारे सर्व साहित्य जगदीश वंजारी यांनी दिले होते. समाज बांधवांच्या वतीने अंबाऋषि टेकडी ग्रुप वृक्षारोपण व संवर्धन छान प्रकारे करतो म्हणून डॉ. अनिल वाणी यांचा सत्कार करण्यात आला.झालेल्या कार्यक्रमात सर्वांनी आपला परिचय करून दिला. कार्यक्रमात नगर परिषदेचे प्रमोद लटपटे,व सोमनाथ वंजारी ,एमइसीबीचे जगदीश वंजारी व सुनील कापसे,ग्रामीण रुग्णालयाचे युवराज वंजारी ,ईश्वर सरपे व रामेश्वर दहिफळे , नवलभाऊ विद्यालयाचे रामेश्वर घुगे,कळमसरे महाविद्यालयाचे प्रा. सुनील गर्जे, प्रताप महाविद्यालयाचे श्री विजय मांटे, रुक्मिणी महिला महाविद्यालयाचे तोंडे सर,पिंपळे आश्रमशाळेचे सतीश कांगणे हजर होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. दिनेश पालवे तर आभार श्री. सुनील गर्जे यांनी मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button