शहरातील नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे- महेश खंदारे…
उदय वायकोळे चांदवड
Chandwad : चांदवड ग्रामीण भागात काही दिवस पासून रुग्ण वाढत असून आज चांदवड शहरातही 3 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याची माहिती समोर येत आहे.त्या अनुषंगाने चांदवड शहरातील नागरिकांनी सुद्धा काळजी घेणे आवश्यक आहे असे आवाहन भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडी नाशिक जिल्हा चिटणीस महेश खंदारे यांनी केले आहे. आज सोमवार बाजार असून अनेक नागरिक विनामास्क फिरताना दिसत होते. भाजीपाला व्यापारी,फिरत विक्रेते यांनी सुद्धा मास्क सॅनिटायझर चा वापर करणे गरजेचे आहे.ग्रामिन भागातून चांदवाड शहरात नागरिकांची दररोज ये जा सुरू असते तरी नागरिकांनी गाफील न राहता काळजी घेणे गरजेचे आहे.
सर्दी खोकला अधिक काळ राहिल्यास तात्काळ स्वब तपासणी करावी जेणेकरून आरोग्य विभागाला पुढील उपाययोजना करणे सोपे होते अशी माहिती महेश खंदारे यांनी ठोस प्रहार च्या प्रतिनिधींशी बोलताना दिली.
कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या काळात महेश खंदारे यांनी स्वखर्चाने वॉर्ड क्रमांक 9 मध्ये आर्सेनिक अल्बम 30 च्या होमिओपॅथी गोळ्या स्वतः घरोघरी जाऊन वाटप केल्या होत्या.यावेळी ते नगरपरिषद निवडणूक साठी त्याच प्रभागातून इच्छूक असल्याचे बोलले जात आहे.






