Pandharpur

शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेच्या पंढरपूर शहराध्यक्षपदी औंकार कुंभार तर युवक शहराध्यक्षपदी अजय राजू गुंड ,शहर उपाध्यक्षपदी विष्णू संभाजी देवमारे यांची निवड

शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेच्या पंढरपूर शहराध्यक्षपदी औंकार कुंभार तर युवक शहराध्यक्षपदी अजय राजू गुंड ,शहर उपाध्यक्षपदी विष्णू संभाजी देवमारे यांची निवड

युवक आघाडीच्या निवडी संपन्न

प्रतिनिधी रफिक आत्तार

पंढरपूर शहरामध्ये संघटनेची आज राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या पुतळ्याला पुष्पाहार घालून विनम्र अभिवादन तसेच जिजाऊ माँसाहेब
उद्यान येथे मिटींग आयोजित करण्यात आली होती.या मिटींगमध्ये पंढरपूर शहर व तालुक्यातील युवक युवती
आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करणात आली.यावेळी शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे आपण जनसामान्यांचे,अपंग, मूकबधिर,शेतकरी, कष्टकरी, शेतमजुर, विद्यार्थी व विद्यार्थीनी,बेरोजगारांना न्याय मिळवून दिला जाईल,सर्व प्रश्न सोडवले जातील.असे म्हणाले यावेळी शिवबुध्द युवा प्रतिष्ठान संघटनेच्या पंढरपूर शहराध्यक्षपदी औंकार कुंभार तसेच पंढरपूर युवक शहराध्यक्षपदी अजय राजू गुंड, व पंढरपूर शहर उपाध्यक्षपदी विष्णू देवमारे,एकमतानी निवड करण्यात आली. यावेळी निवडचे पत्र देताना शिवबुध्द संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे,अँड. सागर आटकळे,आम्ही पंढरपूरकर फाऊंडेशनचे सागर कदम, समाजसेवक सोपान काका देशमुख, देवराज युवा मंचाचे अध्यक्ष शहाजी शिंदे, शिवबुध्द युवा प्रतिष्ठान विद्यार्थी आघाडीचे तालुकाध्यक्षा रोहित लिंगे, विद्यार्थी शहराध्यक्ष ओम महामुनी, आकाश पवार,यांच्या आदेशखालील पुढील कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

यावेळी शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेचे यश घोडके अभिषेक सावंत कालिदास यादव,ओम आंबरे,लक्षण नवले, योगेश फुगारे, मयूर बनकर, तन्वीर शेख,लक्ष्मण नवले, प्रद्युमान चौरे, मंगेश चव्हाण, ओम पवार, आदित्य कंबिरे, ओम आबंरे,आदित्य काळे,
इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्त्ये उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button