Maharashtra

चिंताजनक, शिराढोन येथील महिलेचा मृत्यू

चिंताजनक, शिराढोन येथील महिलेचा मृत्यू

प्रतिनिधी:-सलमान मुल्ला

कळंब- आज उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने आता तिसरा बळी घेतला आहे. कळंब तालुक्यातील शिराढोन येथील एक महिला आज सकाळी उस्मानाबादच्या रुग्णालयात मरण पावली. या महिलेला29 मे रोजी उस्मानाबादच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र या महिलेच्या मृत्यचे कारण अद्याप कळु शकले नाही.

उस्मानाबाद जिल्हयातील काल ९० व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी ७५ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन २ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व तीन व्यक्तीचा अहवाल Inconclusive आला आहे. आणखी दहा अहवाल प्रलंबित असून, त्यांचे रिपोर्ट आज येणार आहे, त्यामुळे आणखी धाकधूक वाढली आहे. .

*उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना बाबत स्थिती खालीलप्रमाणे*

उस्मानाबाद जिल्ह्यात आजपर्यंत एकूण 73 कोरोना रुग्ण सापडले आहेत यापैकी 19 रुग्ण बरे झालेले आहेत तर 51 रुग्णांवर उपचार सुरू आहेत

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button