नंदुरबार आगारातर्फे एस टी कर्मचाऱ्यांचे मा. जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन.
नंदुरबार फहिम शेख
आज दिनांक 29/12/2021 रोजी नंदुरबार आगारातील एस टी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांना निवेदन सादर केले की आम्ही सर्व शोकाकुळ एस. टी. कर्मचाऱ्यांना मे. उच्च न्यायालय मुंबई यांनी आमच्या ज्या कर्मचाऱ्यांचे निधन / मृत्यु झाले आहेत. त्यांच्या दुखवट्यात असल्याचे मान्य व कबुल केले आहे. तसेच त्यांमुळे आमचे शोकावस्थेमुळे मनोधैर्य ही खचले आहे. हे देखील मान्य केले आहे. ज्याचे एकमेव प्रमुख कारण हे संदर्भीय विषयानुसार होत असलेल्या रा.प.अधिकाऱ्यांच्या बेकायदेशीर कार्यवाही तथा धमक्या आहेत. ज्यामुळे संपुर्ण महाराष्ट्र भर रा.प. कामगार हा वैफल्याग्रस्त अवस्थेमुळे स्वतःची जीवन यात्रा संपवत आहे. जे लोकाशाहीच्या दृष्टीने तसेच संविधाना नुसार सुध्दा चुकीचे आहे. तरी आपण आमचे प्रमुखपालक या नात्याने संबंधीतांना योग्य ते आदेश निर्गमीत करुन आंम्हाला सरंक्षण प्रदान करावे.
सदर आशायाचे निवेदन आज सादर करण्यात आले.






