Amalner

?️ दिवाळीत खासगी बसच्या तिकीट दरामध्ये दुप्पट वाढ..ग्राहकांच्या खिशाला कात्री…परिवहन आयुक्तांनी लक्ष देणे आवश्यक..

?️ दिवाळीत खासगी बसच्या तिकीट दरामध्ये दुप्पट वाढ..ग्राहकांच्या खिशाला कात्री…

अमळनेर

दिवाळी आणि सुट्ट्यांच्या हंगामाचा मुहूर्त साधत खासगी बसचालकांनी तिकीट दरात अव्वाच्या सव्वा वाढ केली आहे. त्यामुळे या हंगामात खासगी बसने गावी जाणा-याच्या खिशाला कात्री लागत आहे. सध्या रेल्वेगाड्या मर्यादित आहेत. तसेच राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस (ST) चे आरक्षण फुल होऊ लागले आहे. याच संधीचा फायदा घेत खासगी बस चालकांनी तिकीट दरात दुपटीने वाढ केली आहे. अमळनेर ते पुणे,अमळनेर ते मुंबई खाजगी बस चे भाडे 1500/- रु एव्हढे घेण्यात येत आहे.

सर्वच मार्गांवर खासगी बससेवांचे भाडे दीडपट ते दुप्पट वाढवले आहे. त्यामुळे अनेकांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे.

शासन निर्णयाच्या मर्यादेपेक्षा जास्त भाडे आकारणाऱ्या खासगी बसेसवर प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कारवाई करावी, असे आदेश परिवहन उपआयुक्तांनी दिले आहेत.

सामान्य जनतेत याबद्दल संभ्रम असून शासन निर्णयाच्या मर्यादे पेक्षा अधिक भाडे आकारले जात आहे. ज्या दुप्पट पद्धतीने भाडे घेतले जात आहे तेव्हढी सुविधा देखील उपलब्ध नसल्याचे प्रवाशांनी सांगितले आहे. अश्या खाजगी बस चालकांच्या मनमानी ला आळा बसवावा असे मत ग्राहकांनी व्यक्त केले आहे. अश्या बस मालकांची तक्रार परिवहन आयुक्तांकडे करावी व त्यांनी योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी केली जात आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button