Maharashtra

आरोग्याचा मुलमंत्र घोळणा फुटल्या वर (नाकातून रक्त आल्यावर) सोप्पे उपचार

आरोग्याचा मुलमंत्र

घोळणा फुटल्या वर (नाकातून रक्त आल्यावर) सोप्पे उपचार

वर वर ही समस्या साधी वाटली तरी, या वर उपचार घेणे महत्वाचे असते. अश्या परिस्थितित उन्हात फिरणे टाळावे. बहुतांश वेळा उन्हाळ्यात ही परिस्तिथी उद्भवते.
घोळणा फुटल्या वर चक्कर येणे, डोके दुखणे, डोकं जड होने असे काही लक्षणें दिसून येतात.
या वर काही सोपे उपचार बघू

#. तुरटी पाण्यात उगाळून नाकावर लावल्याने नाकातून रक्त येण्याची समस्या दूर होण्यास मदत होते.

#. उन्हाळ्याच्या हंगामात सफरचंदाच्या मुरांब्यांत वेलची घालून खाल्यानेही फायदा होतो.

#. नाकातून रक्त येऊ लागल्यावर तोंडाने श्वास घेणे सुरु करा.

#. कांदा कापून नाकाजवळ धरल्यानेही फायदा होईल.

#. नाकातून रक्त येऊ लागल्यास डोके पुढच्या बाजूला वाकवा

#. बेलाची पाने पाण्यात उकळवून त्यात खडीसाखर किंवा बताशा घालून ते पाणी प्या. नक्कीच फायदा होईल.

#. नाकातून रक्त येऊ लागल्यास बर्फ कपड्यात गुंडाळून नाकावर ठेवल्याने फायदा होईल.

डॉ. किशोर बाळासाहेब झुटे पाटील
{ होमिओपॅथी तज्ञ }

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button