तन सुखी तर मन सुखी
फिट इंडिया सप्ताहप्रसंगी
डाॅ प्रमोद सोनवणे यांचे मोरांबा आश्रमशाळेत मार्गदर्शन.
— स्वच्छता पंधरवड्याचीही सुरवात.
मनोज भोसले
मोरांबा ता अक्कलकुवा–
शासकीय आश्रमशाळा मोरांबा ता अक्कलकुवा जि नंदुरबार येथे आज *फिट इंडिया मुव्हमेंट अंतर्गत आहार, व्यायाम,झोप व स्वच्छता पंधरवडा* यावर महत्वपूर्ण मार्गदर्शन वैद्यकीय अधिकारी डाॅ प्रमोद सोनवणे यांनी केले.
कार्यक्रमाच्या सुरवातीस मान्यवरांचे हस्ते सरस्वती पुजन व याहामोगी माता प्रतिमा पुजन करण्यात आले.
यावेळी *हॅण्डवाॅशच्या पद्ध्ती अचूक सांगणारे शालेय विद्यार्थींनींना डाॅ सोनवणे यांनी प्रोत्साहनपर रोख बक्षीसेही* दिलीत.
आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तन सुखी तर मन सुखी यानुसार आपलं शरीर निरोगी ठेवण्यासाठी व मन प्रसन्न निरोगी ठेवण्यासाठी प्रत्येकांने प्रयत्न केलाच पाहिजे तरच आपला यशस्वी होण्याचा स्टॅमिना व दीर्घायुष्य वाढेल असे प्रतिपादन डाॅ प्रमोद सोनवणे यांनी केले.
*पिझ्झा ,बर्गर खाद्यपदार्थ, चटपटीत व चायनीज फुड ,कोल्ड्रिंक्स , जास्त जागरण, पुरेसी झोप न घेणे यामुळेच निरोगी माणूस लवकर मृत्यूच्या खाईत* जाऊ शकतो तरी डायबेटीज , बी पी सारखे आजार व मनोविकार टाळण्यासाठी फिट इंडिया मुव्हमेंट यशस्वी राबवून कुटूंब, गाव , जिल्हा, राज्य व देश फिट बनविण्यासाठी युवकांनी खास प्रयत्न करावे असेही डाॅ सोनवणे म्हणाले.
*फक्त वेळोवेळी मुख्यतः जेवणाआधी , शौचानंतर, खेळून आलेनंतर साबणाने स्वच्छ हात धुतले तरी निम्मेहून अधिक आजार होत नसल्याचेही त्यांनी सांगितले.*
प्रसंगी मुख्याध्यापक श्री पी पी महाजन , श्री मरावळे, अधिक्षक श्री कुरकुरे, नरवाडे , आरोग्य केंद्राचे सचिन अग्रवाल, आरोग्य सेवक श्री अहिरे, राठोड सर , वळवी , वसावे आदी शिक्षकांसह विद्यार्थी उपस्थित होते.
फिट इंडिया मुव्हमेंट कार्यक्रमासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी मा डॉ एन डी बोडके, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय डाॅ स्वप्निल मालखेडे सर, वैद्यकीय अधिकारी डाॅ प्रफुल्ल पठाडे यांचे मार्गदर्शन लाभले.
