Chalisgaon

चाळीसगाव तालुक्यात नाम फाउंडेशनच्या सहकार्याने मिशन पाचशे कोटी लिटर जलसाठा अभियानाच्या नाला खोलीकरण व रुंदीकरण कामाचा बोढरे येथून शुभारंभ ६५ गावांमध्ये होणार जलसंधारणाची कामे

चाळीसगाव तालुक्यात नाम फाउंडेशनच्या सहकार्याने मिशन पाचशे कोटी लिटर जलसाठा अभियानाच्या नाला खोलीकरण व रुंदीकरण कामाचा बोढरे येथून शुभारंभ
६५ गावांमध्ये होणार जलसंधारणाची कामे

सोमनाथ माळी चाळीसगाव

चाळीसगाव : चाळीसगाव तालुक्यात मागील तीन वर्षांपासून लोकसहभागातून जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत मागील वर्षी कोरोनाच्या बिकट परिस्थितीतही सोळा गावांमध्ये कामे होऊन एकशे दोन कोटी लिटरचा जलसाठा निर्माण झाला आहे.यावर्षी पासष्ठ गावाचे नियोजन पुर्ण झाले असुन पाचशे कोटी लिटर जलसाठा निर्माण करण्याचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी जलमित्र परिवार, मिशनची पाचपाटील टिम सज्ज झाली आहे. त्या अनुषंघाने नाम फाउंडेशनच्या माध्यमातून मिळालेल्या पोकलॅन्ड मशिनच्या कामाचा शुभारंभ रविवार दि.३१जानेवारी २०२१ रोजी बोढरे गावापासुन मिशन पाचशे कोटी लिटर जलसाठा अभियानाचे प्रमुख ईडीचे जॉईंट कमिशनर डॉ. उज्ज्वलकुमार चव्हाण, नाम फाउंडेशनचे प्रदीप पानपाटील यांचे हस्ते बोढरे शिवारातील अभिषेक दवे यांच्या शेतालगत असलेल्या नाला खोलीकरण करण्यापासून झाला पाचपाटील शेखर निंबाळकर यांनी प्रास्ताविकात शेतकरी वर्गाला कामाची रूपरेषा समजून दिली जितेंद्र परदेशी यांनी कामाच्या नियोजनाची जबाबदारी. घेतली तुफान खोत (कृषी सहायक ) यांनी आभार मानले. मागील वर्षी श्री सुभाष दादा चव्हाण ( माजी जि प सदस्य ) यांनी या अभियाना बाबत माहिती घेऊन नाम फाऊडेशनशी समन्वय साधून दिला होता. त्यांनीही जलमित्र यांचा शी चर्चा करीत कामाच्या नियोजना बाबत चर्चा केली. याप्रसंगी मिशन पाचशे कोटी लिटर जलसाठा अभियानाच्या पाचपाटील टिमचे प्रा.एम.डी.देशमुख, आर. डी. पाटील, प्रा.तुषार निकम, शेखर निंबाळकर,सविता राजपूत, सोमनाथ माळी, शशांक अहिरे, पंकज पवार, मिलींद देवकर, सुचित्रा पाटील ,कृषी सहाय्यक तुफान खोत,तसेच अभिषेक दवे याचे कुटुंबातील सदस्य पंचक्रोशीतील शेतकरी जितेंद्र परदेशी, प्रा. संजय पाटे, दशरथ सोनवणे, उत्तम निकम, प्रदिप सोनवणे (गा पं सदस्य ), चेनासिंग चव्हाण, प्रकाश चव्हाण, दिपक पाटील ,राहुल राठोड, डॉ. संदिप राठोड, डॉ. महेंद्र राठोड (सरंपच सांगवी), श्रीराम राठोड, रविद्र राठोड, रविंद्र जाधव सर, नितीन भोसले, प्रकाश राठोड, प्रल्हाद राठोड, नारायण राठोड, प्रकाश राठोड, बळीराम राठोड उपस्थित होते.

चाळीसगाव तालुक्यात नाम फाउंडेशनच्या सहकार्याने मिशन पाचशे कोटी लिटर जलसाठा अभियानाच्या नाला खोलीकरण व रुंदीकरण कामाचा बोढरे येथून शुभारंभ ६५ गावांमध्ये होणार जलसंधारणाची कामे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button