Maharashtra

संस्पेंक्टेड व कोमॉरबीड पेशंटची स्वतंत्र उपाययोजना करावी विवेक परदेशी आरोग्य समिती सभापती

संस्पेंक्टेड व कोमॉरबीड पेशंटची स्वतंत्र उपाययोजना करावी विवेक परदेशी
आरोग्य समिती सभापती

प्रतिनिधी रफीक आत्तार

पंढरपूरमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत त्याच बरोबर सस्पेक्टेड व कोमॉरबीड रुग्णांचीही वाढ होत आहे. आरोग्य यंत्रणेवर ताण आल्यास अशा पेशंटची हेळसांड होउ नये यासाठी स्वतंत्र उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे आरोग्य समितीचे सभापती श्री.विवेक परदेशी यांनी सांगितले. तसेच सस्पेक्टेड व कोमॉरबीड (न्यूमोनीया व इतर) रुग्णांसाठी स्वतंत्र आयसोलेशन वार्ड करण्यात यावे. यामुळे अशा पेशंटना योग्य वेळी, योग्य उपचार मिळतील,त्यांच्यावर लक्ष ठेवणे सोपे जाईल. यामुळे अशा नागरिकांना संजीवनी मिळेल, मनातील भिती कमी होईल व संभाव्य धोका कमी होईल असेही त्यांनी सांगितले.पावसाला सुरवात झाली असल्यामुळे अधिक काळजी घेण्याची गरज असुन सर्दी, ताप , खोकल्याचे पेशंट वाढत आहे. आपल्या वेळेतुन वेळ काढुन, आपली जिवनशैली योग्य त्या रूटीन मधे म्हणजेच व्यायाम, प्राणायाम, योगासन, मेडिटेशन करुन प्रतिकारशक्ती वाढवणे गरजेचे आहे. स्वत:ची योग्य ती काळजी घेउन, डॉक्टरांची मदत घेउन, खरी माहीती प्रशासनाला,आरोग्य विभागाला देवून सहकार्य करणे गरजेचे आहे. यापुढे सर्दी, ताप, खोकल्याचे पेशंट व कोरोनाचे पेशंट ओळखणे अवघड होत जाणार आहे. त्यामुळे गरज असणाऱ्या पेशंटना अँडमिट करुन, कमी रिस्क असणाऱ्या पेशंटना इतर ठिकाणी आयसोलेशन मध्ये ठेउन तपासणी, औषध ,उपचार केल्यास, कोव्हीड १९ ची तपासणी केल्यास आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होईल असेही त्यांनी सुचवले याची सर्व
नागरिकांना मदत होईल. वरील बाबींचा विचारपूर्वक अभ्यास करुन योग्य त्या उपाययोजना करावयाची नम्र विनंती आरोग्य सभापती श्री विवेक परदेशी यांनी प्रांत अधिकारी मा.सचीन ढोले साहेब, आमदार प्रशांतराव परिचारक, मुख्याधिकारी मा. अनिकेत मानोरकर, नगराध्यक्षा साधनाताई भोसले, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ एकनाथ बोधले, बि.डी.ओ.रविकिरण घोडके,तहसीलदार सौ वैशाली वाघमारे, वैद्यकीय अधिकारी डॉ जयश्री ढवळे, डॉ बजरंग धोत्रे,डॉ राजश्री सालविठ्ठल त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.

विवेक परदेशी
आरोग्य समिती सभापती
नगरपरिषद पंढरपूर

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button