Amalner: अरे बापरे..!शेतात साठवुन ठेवलेला कापूसच चोरांनी केला लंपास..!पोलीसात तक्रार दाखल…!
अमळनेर:- तालुक्यातील लोणखुर्द येथील प्रगतिशील शेतकरी दिनेश साळुंखे यांच्या शेतात वेचून साठवून ठेवलेला गोडावून मधील जवळपास दोन लाख रुपये किमतीच्या 20 ते 22 क्विंटल कापसाची अज्ञात चोरट्यांनीचोरी केल्याचे घटना दिनांक 9 च्या
रात्री 11:30 ते 10 च्या पहाटेच्या सुमारास घडली असून पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोण खुर्द येथील शेतकरी दिनेश निंबा साळुंखे यांनी कापसाचे जास्त उत्पादन
साठवून ठेवण्यासाठी गट नंबर 62/2 मध्ये 30 बाय 50 आकाराचे पत्री शेडमध्ये स्वतःच्या शेतातील वेचून ठेवलेला कापूस साठवून ठेवला आहे. व दिनेश साळुंखे हे रात्री 11:30 पर्यंत दररोज शेतात थांबून असतात तसेच काल दिनांक 9 च्या रात्री 11;30 पर्यंत थांबून त्यांनी गोडावूनला शटर टावू कला लावन घर गाठले सकाळी 7.30 वाजता सालदार संतोष भिला पाटील यांना घेऊन गोडावूनवर गेल्यावर दरवाजे उघडे दिसले व बाहेर पर्यत कापूस पडलेला दिसला,आत गेल्यावर पाहिले असता साठवलेल्या कापसातून 8जवळपास दोन लाख रुपये किमतीचा जवळपास 20 ते 22 क्विंटल कापूस चोरीस गेल्याचे दिसून आल्याने दिनेश साळुंखे यांनी दिलेल्या खबरीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास
पीएसआय विनोद पाटील करीत आहे.






