Paranda

घारगाव येथील नागरिकांची कोवीड तपासणी

घारगाव येथील नागरिकांची कोवीड तपासणी
सुरेश बागडे परंडा
परंडा : परंडा तालुक्यातील.घारगाव येथे कोरोना ग्रामदक्षता समिती आणि प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, सिरसाव यांचे सहकार्यातून रॅपिड टेस्ट कॅम्प घेण्यात आला. या प्रसंगी स्वतः सरपंच काळे, तलाठी श्री. विशाल खळदकर, ग्रामसेविका श्रीमती. भिसे मॅडम, केंद्रप्रमुख श्री. बेळे साहेब यांनी पुढाकार घेऊन स्वतः रॅपिड टेस्ट करून घेतली व इतरांना ही प्रोत्साहित केले. सदर ठिकाणी एकूण 31 टेस्ट घेण्यात आल्या. त्यापैकी 1 टेस्ट पॉजिटीव्ह निघाली..
ग्राम दक्षता समितीच्या वतीने सर्व गावकऱ्यांना विनंती.करण्यांत आली.की कृपया कुणीही अंगावर दुखणं काढ.नये, लगेच तात्काळ टेस्ट करून घेऊन, उपचार घ्यावेत व आपले कुटुंब व आपले गाव कोरोना महामारीपासून दूर ठेवावे.असे. आवाहन अमोल.काळे. यांनी केले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button