sawada

सावदा डायमंड इंग्लिश मीडियम स्कूलची भव्य इमारत मंजूर नकाशा प्रमाणे नाही म्हणून पाळण्यात यावी… अशी मागणी युसूफ शाह यांनी निवेदनाद्वारे केली आहे

सावदा डायमंड इंग्लिश मीडियम स्कूलची भव्य इमारत मंजूर नकाशा प्रमाणे नाही म्हणून पाळण्यात यावी… अशी मागणी युसूफ शाह यांनी निवेदनाद्वारे केली आहे

युसूफ शाह सावदा

सावदा : जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथे दि.४/११/२०१९ पासून न.पा. हद्दीत समाविष्ट झालेली गट क्र.१३४४ च्या शेत जमिनीवर जिल्हाधिकाऱ्यांकडून अंतिम बिनशेती परवानगी घेण्यापूर्वीच जागा मालक शेख हारून शेख इक्बाल वगैरे यांनी अवैधरित्या जवळपास १० हजार स्क्वेअर फूट इतक्या जागेत कोणत्याही शासनाच्या संबंधित सक्षम अधिकाऱ्याकडून रीतसर बांधकाम परवानगी न घेता तसेच जिल्हाधिकारी जळगांव यांच्याकडून अंतीम अकृषिक परवानगी न घेता परस्पर स्वतःच्या समरी पवार मध्ये शाळेच्या नावाखाली एक भव्य बांधलेली इमारत मंजूर नकाशाप्रमाणे नसल्याची तक्रार नुकतेच नगरपालिकेत युसूफ शाह सुपडू शाह यांनी दिलेली आहे.

तसेच नगर रचना विभाग जळगांव यांच्याकडून सदर शेत जमिनीला दि.२३/६/२०२० रोजीचे बांधकाम व बिनशेती शिफारस पत्र सुद्धा मिळण्‍यापूर्वीच समरी मध्ये सदर शेत जागेत भव्य इमारत उभारण्याचा अवैध रित्या कारभार सुरू झालेला होता व आता पूर्ण होण्याच्या अंतिम मार्गावर आहे.

तसेच बेकायदेशीर उभारलेली इमारत मध्ये डायमंड इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज सुरू केली असून त्यात विद्यार्थ्यांना ओपन ऍडमिशन २०२१-२२ देण्यात येईल असे होर्डींग बोर्ड ५ ते ६ महिन्यापूर्वी पासून संपूर्ण सावदा व परिसरात लावण्यात आलेले आहे. तसेच सदरचे होर्डिंग बोर्ड शहरात व परिसरात लावण्याकरिता पालिका प्रशासन कडून परवानगी सुद्धा घेण्यात आली नसल्याची खात्रीलायक माहिती हातीआलेली आहे.

सदरील जागेवर बांधलेली इमारत व सहाय्यक संचालक नगर रचना विभाग जळगाव यांच्या सदरील शिफारस पत्रातील नमूद अटी शर्ती चे सुद्धा जाणीवपूर्वक उल्लंघन जागा मालकांनी केले आहे. बांधलेली इमारत मंजूर नकाशाप्रमाणे नाही सबब ती पाडण्यात यावी व बांधकाम व बिनशेती शिफारस परवानगी रद्द करण्यात यावी अशी मागणी तक्रारीत केलेली असून माहिती व कारवाईसाठी सदरचा तक्रारी अर्ज जिल्हाधिकारी सो. जळगांव सहाय्यक संचालक नगर रचना विभाग जळगांव यांना सुद्धा लवकरच पाठवण्यात येणार आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button