Amalner

सानेगुरुजी कर्मभूमीत सानेगुरुजी ग्रंथालय व वाचनालयाचे कार्य प्रेरणादायी आयपीएस अधिकारी वैभव गायकवाड

सानेगुरुजी कर्मभूमीत सानेगुरुजी ग्रंथालय व वाचनालयाचे कार्य प्रेरणादायी आयपीएस अधिकारी वैभव गायकवाड

अमळनेर : ‘खरा तो एकची धर्म, सर्वांना प्रेम अर्पावे’ याची शिकवण देणार्या सानेगुरुजीच्या कर्मभूमीत सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाला शंभराहून अधिक वर्षाची परंपरा आहे. अशा वाचनालयात स्पर्धा परीक्षा केंद्र चालते.व त्यातून अनेक तळागाळातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत यश मिळवून अमळनेर तालुक्याचे नावलौकीक करीत आहेत. या वाचनालयात आतापर्यंत अनेक क्षेत्रातील मान्यवर ,अधिकारी पदाधिकारी यांनी भेट दिली त्यात मला भेटीचा योग आला व माझा सत्कार केला मी सदैव आभारी राहील. मी स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सदैव कटिबद्ध राहील असे अमळनेर येथील पुज्य सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात सद्या तेलंगणा येथे कार्यरत असलेले आयपीएस अधिकारी वैभव गायकवाड सत्कार प्रसंगी मार्गदर्शन करतांना बोलत होते.
आयपीएस मा.श्री वैभव गायकवाड सर यांची पू. सानेगुरुजी ग्रंथालयाला भेट,ग्रंथालयातर्फ़े त्यांचा सहपत्नीक सत्कार करण्यात आला.नंतर स्पर्धा परीक्षा केद्राचे संचालक विजयसिंह पवार यांनी स्पर्धा परीक्षेचे केंद्राच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना घडवली व वेगवेगळ्या पदांवर आजही कार्यरत आहेत यासाठी त्यांचा सत्कार आयपीएस अधिकारी वैभव गायकवाड यांनी केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रंथालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे होते याप्रसंगी ग्रंथालयाचे चिटणीस प्रकाश वाघ,माजी अध्यक्ष आत्माराम चौधरी, माजी चिटणीस भाऊसाहेब देशमुख व सौ ऋचा गायकवाड व्यासपीठावर उपस्थित होते.
भाऊसाहेब देशमुख , आत्माराम चौधरी व दिलीप सोनवणे यांनी मनोगते व्यक्त केलीत. कार्यक्रम प्रसंगी ग्रंथालयाचे संचालक बापू नगावकर, निलेश पाटील, ईश्वर महाजन, सुमित धाडकर तसेच शिरसाळे हायस्कूलचे मुख्या एस आर बोरसे,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक व्ही एन ब्राह्मणकर व सबगव्हानचे सरपंच नरेंद्र पाटील, निकुंभ सर व निवृत्त आर्मी जवान ज्ञानेश्वर पाटील उपस्थित होते.यावेळी वाचनालयाचे कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले. सुत्रसंचालन व आभार विजयसिंह पवार यांनी मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button